आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरने गमावला भावी इंजिनिअर, लक्झरीच्या धडकेत कुमाराचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दुचाकीस मागून लक्झरी बसने धडक दिल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अमान सैफुद्दीन शेख (वय १६, रा. कर्णिक नगर) असे त्याचे नाव आहे. तो इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल शाखेतून पदविकेचे शिक्षण घेत होता. चालक दादासाहेब कृष्णा खांडेकर (वय ३०, रा. हिरज, उत्तर सोलापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अमान हा शासकीय तंत्र निकेतनचा विद्यार्थी. सकाळी शिकवणी संपून तो अॅक्टिव्हावरून (एमएच १३, जी ३०२१) घरी परतत होता. सकाळी आठच्या सुमारास वालचंद महाविद्यालयाजवळील व्हिवको प्रोसेसच्या रस्त्यावरून जात होता. मागून आलेल्या टाटा स्टार लक्झरी बसने (एमएच १३, डी ९७४८) ने दुचाकीला धडक दिली. तो गंभीर जखमी झाला. येथे मार्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, कोणीही मदत केली नाही. ओळखीच्या एका व्यक्तीने अमानच्या वडिलांना फोनवरून माहिती दिली. काही मिनिटातच ते घटनास्थळी पोचले.

विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
घटनाकळ्यानंतर विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. हाय स्पीड ब्रेकर सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत जड वाहतुकीस बंदीची अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम, लहु गायकवाड यांनीही उपस्थिती लावली. सहायक पोलिस आयुक्त सुभाष नेवे, सहायक पोलिस आयुक्त महिपती इंदलकर, पोलिस निरीक्षक फारुख काझी यांनी उपस्थितांची समजूत काढली. यावर मार्ग काढण्यासाठी सर्वांना पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्याकडे घेऊन गेले.

वडिलांच्या मांडीवर प्राणज्योत मालवली
रस्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला घेऊन वडिलांनी मार्कंडेय रुग्णालय गाठले. मात्र डॉक्टरांनी त्या मुलास मृत घोषित केले. मुलाच्या इंजिनिअरिंगचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलांच्या डोळ्यादेखत त्या रक्तबंबाळ मुलाची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या तोंडून शब्द निघत नव्हते, फक्त डोळ्यातून अश्रू वहात होते. आईला समजताच ती चक्कर येऊन पडली. आजी आजोबा तर फक्त रडतच बसले होते. दोन लहान बहिणी शाळेला गेल्या होत्या. जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्या मुलींचे रडणे पाहून अनेकांना अश्रू आवरणे अवघड गेले.

बातम्या आणखी आहेत...