आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाच्या खूनप्रकरणी आई, मुलास अटक : दोन दिवस मिळाली पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- हात उसनेघेतलेले पाच हजार रुपये देण्यावरून झालेल्या हाणामारीत सिद्धाराम दशरथ कांबळे (वय २२, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) याचा मंगळवारी मृत्यू झाला. या प्रकरणात बुधवारी शेवंता प्रभाकर जहीरे (वय ४०, रा. राहुल गांधी झोपडपट्टी) याना अटक झाली असून दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली अाहे. त्यांचा मुलगा अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात अाले अाहे. लक्षमीबाई कांबळे यांनी जेल रोड पोलिसात फिर्याद दिली अाहे.

जाहीरे यांच्याकडून कांबळे याने हातउसने पाच हजार रुपये घेतले होते. त्यावरून काल रात्री भांडण सुरू होते. त्यावेळी सिद्धाराम याला वीट फेकून मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. मुलाने त्याला फरशीवर जोराने अापटल्यामुळे जखमी झाला. त्यामुळे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. कांबळे हा विजापुरात सेट्रिंगचे काम करत होता. पाच हजार रुपयांसाठी तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत अाहे.

सिंधूविहारमध्ये घरफोडी
विजापूररस्ता, जुळे सोलापूर भागातील सिंधू विहार काॅलनीतील प्रकाश पवार यांच्या घरात चोरी झाली. पंचवीस हजार रुपये एलईडी टीव्ही असा एेवज चोरांनी पळवला अाहे. चार ते सात डिसेंबर या कालावधीत ही घटना घडली.
बातम्या आणखी आहेत...