आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 4 तासांत पोलिसांनी लावला गुन्‍ह्याचा छडा, सिमेंटची पोती असलेला ट्रक नेला होता लूटून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- माढा तालुक्‍यात सिमेंटची पोती असलेला ट्रक लूटल्‍याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्‍यात आली आहे. गरुवारी रात्री मोहोळ पोलिसांनी ही कारवाई केली. राम काटे असे अटक करण्‍यात आलेल्‍या तरुणाचे नाव आहे. मोहोळ  स्‍टेशनच्‍या हद्दीत हायवेवर अल्‍ट्राटेक सिमेंटची पोती असलेला ट्रक राम काटे याने गुरुवारी अडवला होता. नंतर ट्रक चालकाला मारहाण करुन तो ट्रक त्‍याने पळवून नेला होता. माढा येथील एका व्‍यापा-याच्‍या गोउाऊनमध्‍ये ही लूटलेली सिमेंटची पोती त्‍याने ठेवून दिली होती.
 
केवळ 4 तासांत पोलिसांनी लावला छडा
या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर मोहोळ पोलिसांनी केवळ 4 तासात आरोपीला पकडले. सोबतच 11 लाख 18 हजार रुपयांची सिमेंटची पोतीही पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्‍यात घेतली. केवळ 4 तासांत गुन्‍ह्यचा छडा लावल्‍याबद्दल मोहोळ पोलिस स्‍टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र म्‍हस्‍के व मोहोळ पोलिसांबद्दल जनतेतून समाधान व्‍यक्‍त करण्‍यात येत ओह.
 
बातम्या आणखी आहेत...