आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या आमिषाने 2 लाखांची फसवणूक, पोलिस खात्यात चालकाच्या नोकरीची बतावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ‘माझी पोलिस कमिश्नर साहेबांसोबत चांगली ओळख आहे. तुमच्या मुलाला पोलिस खात्यात कोणत्याही वाहनावर ड्रायव्हर म्हणून कामाला लावतो,’ अशी बतावणी करीत खुद्द महिला पोलिस काँन्स्टेबलनेच लाख रुपयांची फसवणूक केलेल्या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे. 
 
माहिती अशी की, फिर्यादी तुकाराम गिरजप्पा सोनटक्के (वय ५४, रा. शिरसी, ता. अक्कलकोट) यांना महिला पोलिस शिपाई सुजाता सुमीत यादवाड (रा. अरविंदधाम पोलिस वसाहत, सोलापूर) संजय तिप्पण्णा हत्ते, (रा. अक्कलकोट) यांनी ही थाप मारली. 
 
हा प्रकार २०१३ मध्ये घडला होता. परंतु नोव्हेंबर २०१७ रोजी यासंदर्भात दुपारी साडेचार वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यादवाड यादवाड यांचे वडील हत्ते यांच्यावर भारतीय दंडविधान ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगताप करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...