आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; होटगीजवळ अपघात, एक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होटगीजवळील पेट्रोलपंपाजवळ (भोसले वस्तीजवळ) पाठीमागून सिमेंट ट्रकची धडक बसल्यामुळे युन्नूस नबीलाल गाडीवान (वय ३८, रा. इंगळगी, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी आठच्या सुमाराला घडला. युन्नूस कांबळे यांनी उपचाराला दाखल केले आहे. आणखी एकजण जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बॉयलरवरून पडल्यामुळे मृत्यू
तैरामैल बसवनगर येथून एका साखर कारखाना साईटवर काम करताना बॉयलरवरून पडल्यामुळे कन्हैय्या इंद्गावन यादव (वय ३२, रा. बिहार, हल्ली- मंदूप परिसर) या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाला घडला. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

होटगीतील तरुणाचा मृत्यू
पेटवूनघेतलेल्या अनिल सिद्गाम गवंडी (वय २६, रा. होटगी) या तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. पेटवून घेतल्याचे कारण अद्याप समोर आले नाही.