आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सवातील नियमात नवीन बदल, १२ ऑक्टोबरदरम्यान चालणार युवकांचा जल्लोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाचा १२ वा युवा महोत्सव ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार असून, महोत्सवाचे यजमान पद केगाव येथील एन. बी. सिंहगड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाने स्वीकारण्यात आल्याची माहिती विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. हनुमंत मते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. पाच कला प्रकारांत प्रथम येणाऱ्या संघाला फिरते चषक, पडद्यामागील कलाकारांचा गौरव आणि पथनाट्य सादरीकरणाची वेळ कमी करण्याचे बदल यंदाच्या महाेत्सवात पाहायला मिळतील, असेही मते यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीमुळे महाविद्यालयांनी महोत्सवाचे प्रायोजकत्व घेण्यास उत्साह दाखवला नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणारा महोत्सव ऑक्टोबरमध्ये होत आहे. उच्चस्तरावर विचारविनिमय करून महोत्सवाचे प्रायोजकत्व घेण्याचे सिंहगडने मान्य केले. महोत्सवात सहभागसाठी ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील.

Áयुवा महोत्सवामध्येप्रथम, दिवतीय तृतीय कलाकार अथवा संघास बक्षिसे देण्यात येतात, परंतु एकांकिका सादर करताना मंच संयोजन करणाऱ्या म्हणजे पडद्याच्या पाठीमागे काम करणाऱ्या कलाकारांना बक्षीस देण्यात येत नव्हते. यंदामुळे या कलावंतांनाही गौरविण्यात येणार आहे.
- भारुडा हाकलाप्रकार सांघिक करण्यात आला आहे. मुख्य, दोन साथीदार, दोन वादक असा संघ असेल.

- युवामहोत्सवातपथनाट्य सादर करण्यासाठी २० ऐवजी १० मिनिटांचा कालावधी राहील.
- युवामहोत्सवघेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रायोजकत्व घेणाऱ्या महाविद्यालयांना अडीच लाख रुपये देण्यात येतात.तसेच स्मृतिचिन्ह प्रमाणपत्रही विद्यापीठाकडून दिले जाईल.
- महोत्सवात विद्यार्थ्यांचापीआरएन नंबर बघूनच महोत्सवात प्रवेश दिला जाणार आहे,त्यामुळे वय बोगस कलाकार यांना आळा बसण्यास मदत होणार आहे.त्यामुळे इतर कलाकारांना न्याय मिळेल.पीआरएन बघण्याची जबाबदारी सिंहगडवर सोपविण्यात आली आहे.

योग्य नियोजन करणार
^सिंहगड पहिल्यादाच युवा महोत्सवाचे आयोजन करत आहे. तसेच महाविद्यालयाकडून योग्य नियोजन करण्यात येईल. महोत्सवात कलाकार विद्यार्थ्यांनी शांततेत युवा महोत्सवात सादरीकरण करावे. काही अडचणी असतील, तर संयोजन कमिटीशी संवाद साधवा.तसेच, प्रत्येक महाविद्यालयाच्या टीमबरोबर दोन समन्वयक देण्यात येणार आहेत.त्यामुळे कलाकार विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होणार नाही.'' शंकरनवले, प्राचार्य, सिंहगड, केगाव

यंदापासून फिरते चषक
यंदा फिरते चषक देण्यात येणार आहेत. संगीत, ललित कला, नृत्य,नाट्य,वाङमय या कला प्रकारात प्रथम येणाऱ्यास यंदापासून विभागनिहाय फिरते चषक देण्याचा निर्णय घेतला आहे. सलग तीन वर्षे फिरते चषक मिळवणाऱ्या महाविद्यालयाला चषक त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. तसेच शिस्त,वेळेचे नियोजन,वेळेवर नोंदणी, स्वच्छता राखणाऱ्या महाविद्यालयांना फ्लेअर प्ले अवाॅर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विद्यापीठ सिंहगडच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पूर्वी संघव्यवस्थापक,विद्यार्थी असे मिळून ४० जणांचा संघ होता. परंतु आता ३५ जणांचा संघ करण्यात येणार आहे .