आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा महोत्सवासाठी यजमान कॉलेजचा शोध जारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा वाढता उत्साह एकीकडे आणि संयोजन पदाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करणारे महाविद्यालये, असे चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही दिसून येते आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊ पाहणा ऱ्या या युवा महोत्सवाचे यजमान पद स्वीकारण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी अजून एकही सरसावलेले नाही.
शहरातील प्रमुख महाविद्यालयांनी एकदाही यजमान पद स्वीकारण्यासाठी स्वारस्य दाखवले नाही. दुसरीकडे आयोजनाचा खर्च म्हणून सहा लाख रुपये देण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे. तरीही जबाबदारीचे ओझे पेलण्याची तयारी महाविद्यालयांची नाही हे स्पष्ट आहे.

^१५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. वाढीव मुदतीत महाविद्यालये प्रस्ताव देतील अशी अपेक्षा आहे.” प्रा.हनुमंत मते, संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ, सोलापूर विद्यापीठ
^युवा महोत्सवाचे नेटके आयोजन करू शकतील अशा महाविद्यालयांचा विचार सुरू आहे. त्यांच्याशी विचार विनिमय करून विद्यापीठ निर्णय घेईल.” डॉ.एन.एन. मालदार, कुलगुरू
बातम्या आणखी आहेत...