आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सवामध्ये वृक्ष लागवडीवर असेल भर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यंदा पर्यावरण जागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला एक रोप आणि कुंडी यजमान महाविद्यालयाकडून दिली जाणार आहे. वृक्ष लागवडीचा संदेश यातून दिला जाणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार फलक युवा महोत्सवनगरीत लावले जातील.
सोलापूर विद्यापीठाचा १२ वा युवा महोत्सव ते आॅक्टोबर दरम्यान आहे. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून त्यासाठी ४० कमिटी स्थापन केल्या आहेत. कला सादर करण्यासाठी रंगमंच उभारले असून मुख्य रंगमंचामध्ये हजार नागरिक बसतील अशी सोय आहे.

विठूरायाच्या नगरीत युवा महोत्सव संपर्क कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या संघांना नोंदणी करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. २५ रोजी सुटी असल्याने २६ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत नोंदणी करता येईल.
यंदाच्या युवा महोत्सवाचे उद््घाटन वारकऱ्यांच्या दिंडीने करण्यात येईल. तसेच विविध तालुक्याच्या ठिकाणाहून येणाऱ्या कलाकारांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी महोत्सव नगरीमध्ये ऑनलाइन पास काढून देण्याची सोय केली जाणार आहे. ऑनलाइन पास काढल्यानंतर कलाकारांना तिसऱ्या दिवशी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल, अशी सुविधा गोपाळपूर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

चार दिवस चालणाऱ्या युवा महोत्सवामध्ये २६ कलाप्रकार सादर करण्यात येतील. दररोज सादर होणाऱ्या कार्यक्रमांचा वृत्तांत फेसबुक, ट्विटर, गुगल पेज तयार करून प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे काही क्षणात युवा महोत्सवाची माहिती जगभर पोहोचवता येणार अाहे.

Ãस्पर्धक विद्यार्थ्यांनीइतर संघाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. हार-जीत होत असते, मिळालेल्या व्यासपीठाचा योग्य वापर करून कलेचे सादरीकरण करावे. गत चार वर्षांत सादर झालेल्या एकांकिका या वर्षी सादर करता येणार नाही. हनुमंत मते, संचालक, डीएसडब्ल्यू

Ãयजमान महाविद्यालयातविविध प्रकारचे संशोधन प्रकल्प तयार केले आहेत. अभियांत्रिकी कला यांचा संगम करण्याचा अभिनव प्रयत्न आहे. कलाकार विद्यार्थ्यांना चांगली सेवा देण्यासाठी महाविद्यालय तयार आहे. प्रा.यशपाल खेडकर

या एकांकिकांवर चार वर्षांसाठी असेल बंदी
यंदासर्जी, दबंग, गोडावून, दृष्टी, रामलीला, दि चेंज, कारवी, अशिल, काऊंटर अॅटक, उंच माझा झोका, एमएमएस, वाट पहाटेची, संब्रान, ब्रेन, मोहर या एकांकिकांना २०१६-१७ या वर्षात तसेच पुढील चार वर्षे सादर करता येणार नाही. यंदा रॅलीमध्ये मतदान जागृती, स्वच्छता अभियान राष्ट्रीय एकात्मता हे विषय असतील.
बातम्या आणखी आहेत...