आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सवाचा जल्लोष आजपासून, 45 महाविद्यालयांतील 1500 विद्यार्थी होणार सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या १४ व्या युवा महोत्सवास उद्या मंगळवेढा येथील संत दामाजी महाविद्यालयात सुरू होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सुमारे ४५ महाविद्यालयांतील १५०० विद्यार्थी युवा महोत्सव प्रांगणात दाखल होणार आहेत. 
 
विविध २६ कलाप्रकारांतून विद्यार्थी सहभाग नोंदवतील. सर्वाधिक स्पर्धा गाजवून सर्वाधिक सांघिक वैयक्तिक यश मिळविणारे महाविद्यालय हे जनरल चॅम्पियनशिपचे विजेते ठरतात. विद्यापीठ युवा महोत्सवाच्या आतापर्यंतच्या १३ जनरल चॅम्पियनशिप चषकांपैकी बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाने तब्बल नऊ वेळा नाव काेरले आहे. हा संघ १४ व्या युवा महोत्सवातही मोठ्या ताकदीने उतरला आहे. अकलूजचे शंकरराव महाविद्यालय, सोलापूरचे दयानंद, वालचंद, संगमेश्वर महाविद्यालयेही बहुतांश स्पर्धेत जिद्दीने उतरल्याने युवा महोत्सवाचे जेतेपद कोण पटकावेल? याची उत्सुकता यात असणार आहे. 
 
- २०१६ मध्ये पंढरपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव झाला. यात शिवाजी महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशिप चषकावर आपले नाव कोरले होते. यानंतर वालचंद द्वितीय तर शंकरराव मोहिते महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे विजेते होते. 
- २०१५ मध्ये सिंहगड अभियांत्रिकीत आयोजित युवा महोत्सवात बार्शीच्या संघाने युवा महोत्सवातील आपला सहभाग अर्धवट सोडला होता. त्यात वालचंद महाविद्यालयाचा संघ जनरल चॅम्पियन चषक विजेता ठरला होता. 
बातम्या आणखी आहेत...