आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरजातीय विवाहाचा राग, पंढरपुरात पत्नी, दीड वर्षाच्या मुलादेखत तरुणाचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नात्यातील संशयित बाराजणांनी सत्तूर तलवारीने हल्ला चढवून एका तरुणाचा निर्घृण खून केला. बुधवारी (दि. ६) रात्री नऊच्या सुमारास येथील भादुले चौकात हा प्रकार घडला. सोमनाथ बाळकृष्ण टाकणे ( वय ३५, रा. पंढरपूर ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी सौदामिनी सोमनाथ टाकणे (वय २४, रा. पंढरपूर ) हिने फिर्यादीत पृथ्वीराज भोसले विशाल भोसले यांच्यासह अन्य दहा संशयितांची नावे घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिस संशयितांच्या शोधात होते.

सोमनाथ टाकणे हा पत्नी सौदामिनी दीड वर्षाच्या मुलाला हॉस्पिटलमधून घेऊन मोटारसायकलवर घरी निघाला होता. वाटेत भादुले चौकात १० ते १२ जणांनी त्याला अडवले. आधी त्याच्या डोळ्यात चटणी फेकून सत्तूर तलवारीने डोक्यात वार केले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. त्यानंतर सर्व मारेकऱ्यांनी पलायन केले. सोमनाथ याची पत्नी सौदामिनी हिने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सौदामिनी ही पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांची कन्या आहे.

पुढे वाचा.. सहा पथके रवाना, तीन महिन्यांपूर्वी शहरात राहण्यास आले होते