आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'प्रत्येकाने आपल्यामधील सुप्त गुण आेळखून त्यांचा विकास करावा' - भालचंद्र नेमाडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रत्येकानेस्वत:तील सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करावा. आपल्या कलागुणांचा स्वत:च्या अर्थार्जनासाठी वापर केल्यास त्याचा आनंद ही वेगळा असतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेकलावंत पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी यांनी केले. स्वेरीमध्ये सोलापूर विद्यापीठ आयोजित १३ व्या युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी बुधवारी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावरील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे आणि साहित्यिक डॉ. गो. मा. पवार यांची अचानक उपस्थिती सर्वांना सुखद धक्का देऊन गेली. भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी प्रमुख पाहुण्या, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्यासपीठावर स्वेरी कॉलेजचे प्राचार्य महोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे, विद्यापीठाचे अधिकारी आणि युवा महोत्सव संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. म्हणाले, यंदा भारूडासह काही कला प्रकार महोत्सवातून वगळण्यात आलेले आहेत, त्यांचा समावेश करण्यासाठी आपण सूचना मांडू. 'स्वेरी'ने महोत्सवाचे कमी कालावधी उत्कृष्टपणे आयोजन केले. आठवड्यात स्वेरीच्या संचालकांनी महोत्सव निधीसीठी लाखो रुपये उभे केले, असे म्हणताच एकच हशा पिकला.
महोत्सवातील चुका कटू अनुभव इथेच सोडा आणि जे काही चांगले घडले असेल ते जरूर बरोबर घेऊन जा असे विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले. प्रारंभी भारूड सम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांनी भारूड सादर केले. स्वच्छता, मुली वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, पाण्याचा काटकसरीने वापर करा असा संदेश दिला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये विद्यार्थ्यांनी दिलखुलास पण त्यांच्या प्रत्येक भारूडाला वन्समोरची मागणी केली. विजेत्यांना पंढरीनाथ कांबळे यांच्ा हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
युद्ध केले तर देश पन्नास वर्षे मागे जातो : भालचंद्र नेमाडे
आपल्यासमोर विशेषत: देशभर आज राष्ट्रभक्ती आणि चुकीच्या मार्गाने युद्धज्वर निर्माण केला जातो. वास्तविक जर युद्ध केले तर देश पन्नास वर्षे मागे जातो, असे सांगितले जाते. त्यासाठी नेमके काय करावे, हे शोधणे आवश्यक आहे. नवी पिढी उदात्त व्हावी. आपण जेवढे उदात्त होऊ तेवढा आपला विजय होईल, असा आपला सिद्धांत आहे. आपण काय केले हे विद्यार्थ्यांना सांगता आले पाहिजे. परकीयांच्या आक्रमणापेक्षा आपल्या देशातील सनातनी लोकांच्या दृष्ट प्रवृत्तीमुळे आपला देश कमी होत गेला. युरोपमध्ये शंभर-दीडशे किलोमीटर अंतर जरी फिरलो तरी मोठी ठिकाणे आढळत नाहीत. मात्र सोलापूर जिल्हा परिसरात दर वीस, पंचवीस किलोमीटर अंतरावर गोपाळपूर, मंगळवेढा, आळंद अशा प्रकारची मोठी मोठी ठिकाणे सापडतात. आपल्याला या गोष्टीची पर्वा नाही. भव्य ते विदेशात ही समज काढून टाकावी. वारकरी सांप्रदायाची अनुभुती जिल्ह्यातून प्रचितीस आली पाहिजे. श्री पांडुरंग हा अठ्ठावीस युगांपासून तटस्थ उभा आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही हटणार नाही, अशी प्रत्येक विद्यार्थ्यांची तयारी असावी.

-----
पंढरीत शोभायात्रेने झाला युवा महोत्सवाचा जल्लोषी समारोप
सोलापूर विद्यापीठाच्या १३ व्या युवा महोत्सवाचा समारोप शोभायात्रेद्वारा करण्यात आला. यात ३४ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. प्रारंभी सर्वांत अग्रभागी असलेल्या यजमान स्वेरी महाविद्यालयाचा संघ होता.
संत दामाजी महाविद्यालयाच्या संघाने मतदान जागृतीचा विषय हाताळला. बी. पी. सुलाखे महाविद्यालय बार्शीने पर्यावरणाचे रक्षण तसेच मतदान जागृती साधली. केबीपी महाविद्यालय पंढरपूरने मतदान जागृतीसाठी जागर केला. सी बी खेडगीज महाविद्यालयाने राष्ट्रीय एकात्मता विषय हाताळला. दयानंद वेलणकर महाविद्यालयाने वारकरी दिंडी काढून स्वच्छतेचा नारा दिला.

वसुंधरा महाविद्यालयाने राष्ट्रीय एकात्मता हा विषय शोभा यात्रेद्वारे हाताळला. शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या संघाने शोभायात्रेत प्रथम क्रमांक पटकाविला. या संघाने प्रभावी पद्धतीने मतदान जागृती साधली. संगमेश्वर महाविद्यालयानेही मतदान जागृती हा विषय हाताळला. वालचंद महाविद्यालयाने राष्ट्रीय एकात्मता हा विषयावर जागर केला. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटने मतदानासाठी शोभा यात्रेतून संदेश देत जागृती साधली. विद्यापीठ अधिविभागाच्या संघाने उत्तम सादरीकरण करीत जागृती साधली. विज्ञान महाविद्यालय सांगोला संघाने पर्यावरण जागर केला. प्रारंभी स्वेरीचे प्राचार्य बी. पी. रोंगे यांनी शोभायात्रेला मार्गस्त केले. यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक प्रा. हनुमंत मते, प्रा. यशपाल खेडकर, प्रा. प्रभाकर कोळेकर, प्रा. गुणवंत सरवदे, प्रा. राम पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. समारोपाच्या दिवशीही विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता.
बातम्या आणखी आहेत...