आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक काँग्रेस: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, सरकारने जनतेची फसवणूक केली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- नोटबंदीच्या निर्णयामुळे जनता हवालदिल झाली असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमारे उपोषण केले. या वेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ११५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू रांगेतच झाला आहे, तरीही सर्वसामान्यांना हक्काचे पैसे मिळणे अशक्य झाले आहे.जुन्या नोटा किती जता झाल्या नवीन किती चलन उपलब्ध झाले याचाही तपशील देण्यात आलेला नाही. नवीन नोटा भाजपच्या पुढाऱ्यांकडे सापडलेल्या आहेत, असे गंभीर आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि. ३) उपोषण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनामध्ये प्रदेश महिला काँग्रेसच्या डॉ. स्मिता शहापूरकर, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, मीडिया सेलचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, युवक काँग्रेसचे विनोद वीर, नितीन बागल आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...