आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मूलभूत सुविधांसाठी युवा सेना रस्त्यावर, आंदोलनामुळे मुख्य मार्गावर कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- शिवसेना-युवासेनेनेनागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी (दि.१६) येथील मुरारजी बाजीप्रभू देशपांडे चौक, भाजी मंडई परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळंुके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मोरवे बिल्डिंग ते वैराग नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम मागील वर्षांपासून पूर्ण रखडले आहे. कामाचा कार्यारंभ आदेश देऊन वर्ष पूर्ण झाले आहे. विद्यमान उपनगराध्यक्षांचा हा प्रभाग आहे. तरीही या भागाचा विकास खुंटला आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असा आरोप शिवसेनेने यावेळी केला.

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्याचे दिवस असूनही धूर फवारणी करण्यात आलेली नाही. शहरात घाण, तुंबलेल्या गटारी, कचरा आदींमुळे साथरोगांचा फैलाव झालेला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सांडपाण्याच्या नाल्यांची पडझड झाली आहे, जुन्या नाल्यांची सांडपाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्याने नव्याने बांधण्याची गरज आहे. परंतु अकार्यक्षम नगरपालिका प्रशासनाला अद्याप घाम फुटलेला नाही. नागरिकांच्या समस्येशी सत्ताधाऱ्यांना लेणे-देणे नसल्याचे दिसून येत आहे. समस्यांचे निवारण करण्यासाठी पािलकेला भाग पाडू.

या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख सूरज साळंुके, तालुकाप्रमुख दिलीप जावळे, भारत नाना इंगळे, प्रदीप साळुंके, राजाभाऊ घाडके, शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव, पप्पू मुंडे, तुषार निंबाळकर, रवी वाघमारे, बाळासाहेब काकडे, बाळासाहेब देशमुख, हरिभाऊ शिंदे, खालेद शेख, साबेर भाई, असद रजवी, कलीम कुरेशी, पांडुरंग माने, कुणाल निंबाळकर, प्रतीक रोचकरी, पंकज माने, सह्याद्री राजेनिंबाळकर आदींसह शेकडोे शिवसैनिक, युवासैनिक या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनात पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

युवा सेनेने मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता उस्मानाबाद येथे बाजीप्रभू देशपांडे चौकात ठिय्या मांडला. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

१८५ कोटींचा चुराडा
उजनीचेपाणी आणण्यासाठी सुमारे १८५ कोटी रुपयांचा चुराडा झाला. परंतु अद्यापही शहराची तहान भागलेली नाही. पाइपलाइनचे पाइप अनेक दिवसांपासून धूळ खात पडले आहेत. पावसाळ्यात शहराला १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे, असा आरोप सूरज साळुंके यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...