आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळ नव्हे 'स्व' निधीसाठी धावले झेडपीचे धुरंधर सदस्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दुष्काळाने होरपळत असलेल्या ग्रामीण जनतेला दिलासा देणारे अार्थिक नियोजन करण्याऐवजी जिल्हा परिषदेतील 'धुरंदर' सदस्यांनी वार्षिक अंदाजपत्रक (२०१६-१७) सभेत वैयक्तिक विकासकामांना निधी मंजुरीसाठी 'लॉबिंग' केले.

यंदा फेब्रुवारीअखेर फक्त ३५ टक्के निधी खर्च झाला आहे. तरीही नव्या तरतुदींसाठी चढाओढ सुरू होती. या प्रकाराबद्दल सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या गोंधळात अर्थ समितीचे सभापती तथा उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख यंानी ४५ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले.

जिल्हा परिषेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा बुधवारी अध्यक्ष जयमाला गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. जिल्ह्यात भीषण दुष्काळ अाहे. शासकीय योजना अन् तरतुदींकडे बोट दाखवत दुष्काळाने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देणाऱ्या कोणत्याही ठोस तरतुदींचा समावेश अर्थसंकल्पात दिसून आला नाही. एरवी दुष्काळाबाबत गळे काढणाऱ्या सदस्यांनी त्याबाबत ठोस तरतुदींसाठी आग्रह ठरला नाही.

निवडणुकीवर डोळा : पुढील वर्षी जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. सदस्यांसाठी निधी नसल्याने त्यांच्या मागणीनुसार कामांसाठी प्रत्येकी सात ते दहा लाख रुपयांची तरतूद करावी, यासाठी मात्र सर्व सदस्यांनी जोरदार लॉबिंग केले.

उपाध्यक्ष देशमुख यांनी विविध विकासकामांसाठी राखवून ठेवलेला निधी त्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. उत्पन्न वाढीसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नसल्याबाबत सुरेश हसापुरे यांनी संताप व्यक्त करीत अर्थसंकल्प असमाधानकारक असल्याचे सांगितले.

दलित वस्तीमध्ये वाचनालय सुरू करा
धैर्यशीलमोहिते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दलित वस्तीमध्ये वाचनालय सुरू करावे, जिल्हा परिषद, पंचायत समिती मुख्यालयात संविधानाची कोनशिला बसवण्यात यावी, मे महाराष्ट्रदिनी गुणवंत कर्मचारी पुरस्कार सुरू करावेत, अशी मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...