आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तास्थानी राष्ट्रवादी, कलहामुळे अडचणीत; जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत लागणार कस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विधानपरिषद नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत संघर्ष करावा लागणार आहे. राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता आहे तर महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असला तरी अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष विस्कटला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक असूनही विधानपरिषद नगरपालिका निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळविता आले नाही, तर काही ठिकाणी पक्षाने सोईस्कर भूमिका घेतल्याने पक्ष अधिक अडचणीत आला आहे. 

जिल्ह्यात आमदार, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महापालिकेचा उपमहापौर, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक अशी सर्व सत्तास्थाने ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता ताब्यात घेण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादीचे प्रशांत परिचारक आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीविरोधातच निवडणूक लढविली. 

खासदार मोहिते यांच्या भूमिकेकडे लक्ष... 
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते खासदार विजयसिंह मोहिते राष्ट्रवादी पक्षापासून आलिप्त राहिल्याचे चित्र आहे. त्याला कारणही तसेच आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. विधानपरिषद निवडणूक, नगरपालिका निवडणुकीत स्वत: जातीने लक्ष घालून प्रचारसभा घेतल्या, पक्षातील गटबाजी थांबविण्याचे आवाहन करीत पक्षाला ताकद देण्याचे आवाहन केले. याशिवाय त्यांनी शहर-जिल्ह्यात बैठकाही घेतल्या, या बैठकांना खासदार मोहिते गैरहजर राहिल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत खासदार मोहिते यांची भूमिका काय असणार ? यावरही राष्ट्रवादीचे यश अवलंबून असणार आहे. 

तिसरी आघाडीही निर्णायक भूमिकेत... 
राष्ट्रवादीतूनचबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील नेत्यांनी तिसरी आघाडीची स्थापना केली आहे. निवडणुकीबाबत त्यांनी यापूर्वी बैठकाही घेतल्या आहेत. यामुळे तिसरी आघाडीही जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार की तिसऱ्या आघाडीसोबत जाणार ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार ? हे लवकरच स्पष्ट होईल.