आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झेडपी, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवडणूक आयोगाने प्रभाग, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यंदा माढा, मोहोळ माळशिरस या तीन नवीन नगरपालिका झाल्याने तीनही तालुक्यातील नवीन जि.प. गट होण्याची शक्यता आहे.
६८ जिल्हा परिषद गट १३६ पंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आरक्षण सोडतीचा कालावधी निश्चित केला आहे. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना सप्टेंबर ते २५ नाव्हेंबर या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

नवीन रचनेकडे लक्ष... : माढा,मोहोळ माळशिरस या तीन नवीन नगरपालिका झाल्याने जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणाच्या रचनेत बदल करावा लागणार आहे. यामुळे तीनही तालुक्यातील जि.प. गट पंचायत समितीच्या गण रचना करताना यंदा नवीन गट नवीन गण करावे लागणार आहेत. यामुळे हे नवीन गट गण कोणते असणार याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे लक्ष लागून राहिले आहे.

सप्टेंबर - जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करतील.
२३ सप्टेंबर - विभागीय आयुक्त प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देतील.
२८ सप्टेंबर - आरक्षण सोडतीसंबंधी जाहीर प्रसिद्धीकरण
ऑक्टोबर - जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद गटाची सोडत काढतील तर तहसीलदार तालुकास्तरावर पंचायत समिती गणाची सोडत काढतील.
१० ऑक्टोबर - जि.प. गट पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्धी.
१० ते २० ऑक्टोबर - प्रभाग रचनेसंबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती सूचना सादर करणे.
१७ नोव्हेंबर - जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त हरकती, सूचनांवर सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम करणे.
२५ नोव्हेंबर - अंतिम प्रभाग रचना आरक्षणास राजपत्रात प्रसिद्ध करणे
बातम्या आणखी आहेत...