आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपंग विवाह अर्थसहाय्य थकले, अपंग दांपत्यांना अनुदान नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपंग व्यक्तींसोबत विवाह करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. निधीअभावी शासन दरबारी जिल्ह्यातून पाठवण्यात आलेले ४१ प्रस्ताव धूळखात पडून आहेत. या प्रस्तावांपोटी दोन कोटी ५० हजार मिळणे पेक्षित असताना अद्याप एक छदाम मिळालेला नाही.

विविध कारणांमुळे अपंग झालेल्या व्यक्तींना बहुतांश वेळा उपेक्षिताचे जीवन जगावे लागते. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना वागणूक मिळत नाही. अपंग व्यक्तींच्या उत्कर्षासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना त्यांना कदाचित आर्थिक स्थैर्य मिळवून देतील. मात्र, सर्वसामान्यांच्या जीवन जगण्याची सर त्यांना येऊ शकत नाही. यामध्ये विवाहाचा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा आहे. कोणत्याही व्यक्तीला आपला जोडीदार अपंग असावा असे मनोमन वाटत नाही. यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी समाज कल्याण विभागाने "अपंग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य' ही योजना सुरू केली आहे. मात्र, ही योजनाच अपंग झाल्याची परिस्थिती आहे. शासनाने ही योजना मोठ्या उत्साहाने सुरू केली. मात्र, योजनेला राजाश्रय दिला नसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यातून या योजनेसाठी ४१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. मात्र, सध्या प्रस्ताव धूळखात पडून आहेत.

शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे अपंगांना साहाय्य मिळालेले नाही. यामुळे शासनाकडून अपंगांची अवहेलना सुरू असल्याचे चित्र आहे. एकीकडे शासनच योजना सुरू करते. मात्र, नंतर शासनाकडूनच त्या योजनेसाठी निधी दिली जात नाही. यामुळे योजनेचा उद्देशच सफल होत नाही. अपंग नसलेल्यांना अपंगांशी विवाह करण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना मानली जात होती. मात्र, आता खच्चीकरणच होत आहे.

कार्यालयात फेऱ्या मारून जोडपी थकली
यायोजनेमध्ये एप्रिल २०१४ पासून प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली. त्यावेळी दाखल करण्यात आलेले प्रस्ताव अद्यापही मंजूर होऊन रक्कम हातात आली नाही. त्यामुळे अनेक जाेडपे कार्यालयात फेरे मारत होते. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे तेही थकले आहेत.
बातम्या आणखी आहेत...