आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करमाळ्यात १४८ विद्यार्थ्यांना विषबाधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा (जि. सोलापूर) - येथील कोर्टीच्या श्री शिवाजी प्रशालेतील सातवी ते नववीच्या १४८ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी घडली. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातवी ते नववीच्या वर्गांची शनिवारी सकाळी शाळा होती. साडेनऊच्या मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे मुख्याध्यापक छगन माने, शिक्षक भर्तृहरीनाथ अभंग यांच्यासह ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल केले. पालकांसह शहरातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.