आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापुर शहरातील अपघात मालिकेत दहावा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मोदी पोलिस चौकीसमोर ट्रक व रिक्षाची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातातील जखमी रिक्षाचालकाचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता.31) घडला होता. प्रभाकर तिपण्णा कोळी (वय 48, रा. निराळेवस्ती, गणपती मंदिराजवळ, सोलापूर) असे मृताचे नाव आहे.
गेल्या आठ दिवसात शहरात घडलेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता 10 वर गेली आहे. मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमाराला रिक्षातून (एमएच 13 जी 8761) प्रवासी भाडे घेऊन जुळे सोलापुरात जाताना सात रस्त्याहून येणार्‍या ट्रकची धडक बसल्याने कोळी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली होती. मागील दोन दिवसांपासून शासकीय रुग्णालयात ते मृत्यूशी झुंज देत होते. सदर बझार पोलिसात या अपघाताची नोंद आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.
हलाखीची परिस्थिती
- कोळी यांचे छोटेसे पत्र्याचे घर आहे. भाड्याने रिक्षा घेऊन ते चालवित होते. घटनेदिवशी सव्वादहाच्या सुमाराला त्यांना रेल्वे स्टेशन चौकातून दावत हॉटेलजवळील प्रवासी भाडे मिळाले होते. मोदी पोलिस चौकीजवळ आल्यानंतर दुर्दैवी अपघात झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. मोठी मुलगी गुड्डी दहावीत असून दुसरी मुलगी बाई ही सहावीत शिकतेय. गोट्या नावाचा मुलगा चौथीत शिकतोय. रिक्षावरच या कुटुंबाचा चरितार्थ चालतोय. आता घरातील कर्त्याचाच अपघाती मृत्यू झाल्यामुळे कोळी परिवार हादरून गेले आहे.
8 दिवसांतील अपघात आणि मृतांची संख्या..
मागील गुरुवारी : पोगूल विहिरीजवळ दोन कामगार
अशोक चौकात विद्यार्थी मृत्यू
शनिवारी : शांती चौकात कामगाराचा मृत्यू
सोमवारी : पत्रकारभवन चौकात तरुणीचा मृत्यू
बाळेजवळ वॉचमनचा मृत्यू
मंगळवारी : पाकणीजवळ कामगार, बाळेजवळ बार्शीचा विद्यार्थी, नीलमनगरात कामगाराचा मृत्यू
गुरुवारी : मोदी पोलिस चौकीजवळ रिक्षाचालकाचा मृत्यू
ठाणेनिहाय अपघात
सदर बझार : दोन
जेल रोड : दोन
एमआयडीसी : तीन
फौजदार चावडी : दोन
मोहोळ पोलिस ठाणे : एक