आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadami Party News In Marathi, Traders, Lok Sabha Election, Divya Marathi

व्यापार्‍यांना ‘आप’लंसं करणं झालं अवघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलबीटीच्या मुद्दय़ावर व्यापार्‍यांना आपलंसं करून घेण्यासाठी सर्वच पक्ष खटाटोप करीत आहेत. त्यातच सोमवारी दुपारी साडेबारा वाजता शिवानुभव मंगल कार्यालय येथे ‘आप’ने आयोजित केलेल्या व्यापार्‍यांच्या मेळाव्यात व्यापार्‍यांनी पाठ फिरवली. त्यामुळे मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या ‘आप’च्या नेत्या अंजली दमानिया यांनी अवघ्या पाच मिनिटांत आपले भाषण आटोपले.


एलबीटीच्या मुद्दय़ावरून व्यापार्‍यांची मते मिळवण्यसाठी कॉँग्रेस, भाजप खटाटोप करीत आहेत. याच धर्तीवर आम आदमी पार्टीने सोमवारी व्यापार्‍यांचा मेळावा आयोजित केला. मेळाव्याची वेळ दुपारी साडेबाराची होती. मात्र मोहोळ येथील पदयात्रा संपवून येईपर्यंत दमानिया यांना दोन तास विलंब झाला. शिवानुभवमध्ये दमानिया यांचे आगमन झाल्यानंतर तेथे व्यापारी नसल्याचे पाहून ‘आप’च्याच कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुच्र्या भरून काढल्या.


एलबीटी विरोधात आप
‘मुंबईमध्ये एलबीटी विरोधात मुंबई चेंबर ऑफ चेंबर्स बरोबर आम्ही होतो, सोलापुरातही राहू. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’चे जेवढे उमेदवार निवडून येतील ते विरोधकाची उत्तम भूमिका बजावतील. मुळात भ्रष्टाचार, शोषण, गैरप्रकार अशांना आळा घालण्यासाठीच ‘आप’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे ‘आप’च्या उमेदवारालाच मते देऊन निवडून आणावे,’ असे आवाहन अंजली दमानिया यांनी केले.


घोटाळेबाज काय विकास करणार
ललित बाबर यांना मतदारांनी का म्हणून मते द्यावी, त्यांचे काय योगदान आहे, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दमानिया म्हणाल्या, ‘शेअर्स घोटाळेबाज हर्षद मेहता यांचे वकील असलेले बनसोडे जर निवडून आले तर ते काय विकास करणार, असा उलट प्रश्न करत अशा लोकांपेक्षा बाबर कधीही उत्तमच ना.’