आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभयसिंहांची 'डरकाळी,' वडिलांकडून अभिनंदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दहावी परीक्षेत बोर्डात चमकता आले नाही. ही सल कायम राहिली. त्यानंतर इंजिनिअर झालो. विक्रीकर निरीक्षक, सहायक गटविकास अधिकारी पदाच्या परीक्षामध्ये यश मिळवले. परंतु आणखी काही तरी करायचे जिद्द होती. रविवारी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला आल्याचा फोन आला. माझा स्वत:वर विश्वास बसत नव्हता. लगेच वडिलांना फोन केला, दहावीनंतर तब्बल अकरा वर्षांनी त्यांनी अभिनंदन केले. हे माझ्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक होते, अशा शब्दात अभयसिंह अर्जुनराव मोहिते (रा.कचरेवाडी, ता. मंगळवेढा) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एमपीएससी परीक्षेत ४७० गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकाविलेल्या अभयसिंह यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत सहायक बीडीओ अमोल जाधव उपस्थित होते. निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परीक्षेत उत्तीर्ण होणार याची खात्री होती, निकाल लागल्याने रविवारी राज्य सेवा आयोगाची परीक्षा सोलापुरातच दिली. पेपर देऊन बाहेर आलो, मोबाइल चालू केला अन् मित्राचा फोन आला, तू राज्यात प्रथम आला. लागलीच वडिलांना आईला फोन करून निकालाची माहिती दिली. वडिलांचे अभिनंदनाचे शब्द कानी पडताच पुरता शहारून गेलो. भविष्यात यूपीएससीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाषेला ग्रामीण बाज, पण आत्मविश्वास वाढविला : बी.ई.नंतर आठ ते दहा मोठ्या कंपन्यांमध्ये प्रयत्न केला, पण संधी मिळाली नाही. इंग्रजीवर प्रभुत्व पण भाषेला ग्रामीण टच होता, त्याचा फटका बसला. नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. सकाळी आठच्या अगोदरपासून आणि रात्री आकरा वाजेपर्यंत कार्यमग्न राहायचे असा माझा नित्यक्रम राहिला. मोबाइलपासून दूर राहिलो. अभ्यासावर लक्ष केंद्रित केले, मन लावून अभ्यास केला. आणि यश पटकािवता आले.

इंजिनिअरिंगते स्पर्धा परीक्षा : दहावीनंतरचस्पर्धा परीक्षा द्यावी, असा विचार होता. मित्रांमुळे इंजिनिअरिंगकडे वळलो. इंजिनिअरिंगमध्ये मन रमत नव्हते, परंतु अभ्यासात ब-यापैकी रूची असल्याने पास होत गेलो. पण त्यातील मला काहीही येत नाही. उपळाईचा स्वप्नील पाटील आयआरएस झाला आहे, त्याच्या सहवासातून प्रेरणा मिळत गेली. स्पर्धा परीक्षेचा हा तिसरा अॅटेम्ट होता. त्यानंतर हे यश पटकाविता आले.

मशीनपेक्षा माणसांशी डील...
लोकसंपर्कातराहण्याचे क्षेत्र म्हणून प्रशासकीय अधिकारी पदाचे मला आकर्षण राहिले. मशीनशी डील करण्यापेक्षा लोकसंपर्कात राहून कार्याला दिशा देता येईल, असे वाटल्याने स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करण्याचे ठरविले. मराठी भाषेतून आणि ग्रामीण भागातून शिक्षण घेतले तरी यश मिळविता येते. स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग लावले नाही. युनिक अकॅडमीमध्ये तोंडी परीक्षा सराव केला. पेपर वाचणे, इंग्रजी वर भर देणे आणि विविध स्पर्धा परीक्षा देत राहणे हेच यशाचे गमक आहे.