आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abnormal Girl Dead Due To Food Poisoning In Solapur

विषबाधेमुळे मतिमंद तरुणीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नीलम नगर भाग दोनमधील श्री हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मतिमंद मुलींच्या बालगृहात एका तरुणीचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली. सपना देविदास रासकोंडा (वय 18) हीस सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दूध आणि बिस्किटे देण्यात आली होती. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तसेच नसरीन शेख (वय 15) हीस असाच त्रास सुरू झाल्याने तिला दाखल करण्यात आले. सायंकाळी सहाच्या सुमारास नसरीनला बरे वाटत असल्याने बालगृहाकडे पाठवण्यात आले. परंतु पुन्हा आठच्या सुमारास उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने तिच्यावर लोकमंगल जीवक हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद डॉ. चांदेकर यांनी दिली. बालगृहामध्ये अनेक विद्यार्थीनी असताना दोघींनाच विषबाधा कशी झाली? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

आम्ही आमचे काम केले
सदरहू तरुणीस त्रास सुरू झाल्यावर आवश्यक उपचारासाठी सिव्हिल येथे दाखल केले. परंतु तिचे अकस्मात निधन झाले आहे. आम्ही आमचे काम केले. बाकी तिचा मृत्यू कशाने झाला? हे तपासाअंती समजेल. सदाशिव धोत्रे, संस्थाचालक

नमुने घेतले आहेत
घटनेची माहिती मिळताच संबंधित जागेवर जाऊन दुधाचे व बिस्किटाचे नमुने घेतले आहेत. व्हीसेरा रिपोर्ट राखून ठेवला आहे. नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. एम. एच. निंबर्गी, पोलिस निरीक्षक, तपास अधिकारी