आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abortion News In Marathi, Abortion Issue At Solapur, Divya Marathi

गर्भलिंग चाचणी प्रकरणी महिलेची इनकॅमेरा चौकशी करा- जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गर्भलिंग चाचणी प्रकरणी मनपा आरोग्याधिकारी डॉ. श्रीकांत वैद्य यांनी संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली तर दुसरीकडे संघटनेने डॉ. ज्योती तापडिया व डॉ. संदेश कादे यांच्या पाठीशी राहत त्या महिलेचा जीव वाचवल्याचे सांगितले. परिणामी नेमके दोषी कोण, हा विषय समोर आला. यावर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी आरोग्य अधिकारी वैद्य यांना त्या महिलेची इनकॅमेरा चौकशी करण्याचे आदेश दिले.

गर्भपातप्रकरणी डॉ. तापडिया व डॉ. कादे यांना नोटीस बजावली. त्या महिलेचा जीव वाचवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ‘पीडित महिलेचीच इनकॅमेरा चौकशी करा. तिच्याकडून मिळालेली माहिती रेकॉर्डवर आणा आणि हे सर्व काम तत्काळ करा’, असे आदेश डॉ. गेडाम यांनी दिले.
घटना आणि करण्यात आलेली कारवाई यामध्ये मोठा कालावधी गेला आहे. यामुळे त्या महिलेचा जबाब या प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने तिची इनकॅमेरा चौकशी करण्याचे आदेश दिले