आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या ‘एसी’त दरवाढीच्या झळा; फर्स्ट क्लासपासून ते थ्री टायरपर्यंत होणार दरवाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तिकिटाच्या दरात गेल्या आठ वर्षांपासून दरवाढ न केल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीय रेल्वेने अर्थ मंत्रालयाच्या सूचनेवरून वातानुकूलित डब्यांच्या तिकीट दरात सेवाकराच्या नावाखाली वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील.
सध्या रेल्वे तिकिटातून 12 टक्के सेवाकर सरकारी तिजोरीत जमा होतो. यापुढे तिकिटावर शैक्षणिक अधिभार व उच्च शिक्षण अधिभार लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. दरवाढीचे परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने 26 जून रोजी काढले आहे. हा अधिभार सेवाकराच्या रकमेवर अवलंबून असेल.
3.7 टक्के अधिभार असणार आहे. यात शैक्षणिक अधिभार दोन टक्के व उच्च शिक्षण अधिभार एक टक्का आहे. वातानुकूलित प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी व तृतीय श्रेणीचा समावेश असेल. हा निर्णय शताब्दीसारख्या संपूर्ण वातानुकूलित गाड्यांनाही लागू करण्यात आला आहे. तिकीट दरवाढीतून मिळणारे उत्पन्न रेल्वे स्वत:कडे न ठेवता अर्थ मंत्रालयाकडे सुपूर्द करणार आहे.
या निर्णयाचे परिपत्रक रेल्वेने काढले असून, तो कधीपासून लागू करायचा याबाबत विचार सुरू आहे. देशातील रेल्वेच्या सर्व विभागांना या संबधीचे आदेश देण्यात आले असून, अंमलबजावणीसाठी सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
आदेश येताच कारवाई- रेल्वे मंत्रालयाकडून यासंबंधीचे परिपत्रक आले आहे. त्याची अंमलबजावणी कधीपासून करायची याचा विचार सध्या रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे. पुढील आदेश येताच कार्यवाही केली जाईल.- सुशील गायकवाड, व्यवस्थापक, वरिष्ठ वाणिज्य मंडळ
‘वेटिंग लिस्ट’पासून रेल्वे प्रवाशांची सुटका
‘त्यांनी’ आयुष्यात पहिल्यांदाच रेल्वे पाहिली तेव्हा...