आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर - पुणे रस्त्यावरील बाळे-केगाव येथे कंटेनर-आयशरचा अपघात; एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुणे रस्त्यावरील बाळे-केगाव दरम्यान कंटेनर व आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. काशिनाथ देवराम निघोट (वय 40, रा. मंथळखेड, आंबेगाव, पुणे) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शनिवारी पहाटे साडेपाचला घडला. योगेश काळे (रा. पुणे) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
आयशर टेम्पो (एमएच 14 सीपी 7277) मधून योगेश, मनोज व काशिनाथ तिघेजण सोलापूरकडे येत होते. केगाव पुलाजवळ चुकीच्या दिशेने कंटेनर (एपी 16 टीबी 1042) येऊन आयशरला धडकल्याने काशिनाथ जमखी होऊन मरण पावला. अन्य तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.