आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: करमाळ्याजवळ अपघात; गुलबर्ग्याचे तिघे जागीच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा- फॉर्च्युनर मोटार आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कर्नाटकातील गुलबर्गा येथील तीन जण जागीच ठार झाले. ही घटना नगर-सोलापूर रस्त्यावर करमाळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या उपकेंद्राजवळ रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमाराला घडली.
या घटनेची करमाळा पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शिर्डीहून दर्शन घेऊन अमित बसवराज पाटील (वय ३२, रा. कुंवा प्लॅन्ट, गुलबर्गा), सुभाष कोरवार (वय ४०, रा. नेहरू गंज गुलबर्गा), संतोष नायर (वय ४०, रा. गुलबर्गा) आणि शरणबसव्वा बिराजदार हे फॉर्च्युनर मोटारीने (केए ३२ डी ७७७) करमाळ्याकडे निघाले होते. तेव्हा समोरून नगरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने (एचआर ३८ क्यू ६२५२) मोटारीला जोरदार धडक दिली. त्यात मोटार चक्काचूर होऊन अमित बसवराज पाटील, सुभाष कोरवार, आणि संतोष नायर हे तिघे जागीच ठार झाले. त्यांच्या सोबत असलेल्या शरणबसव्वा बिराजदार या गंभीर जखमी झाल्या.
घटनेचे वृत्त कळताच पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमी बिराजदार यांची विचारपूस केली. घटनास्थळी करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी तातडीने भेट देऊन पोलिस कर्मचारी आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमीस सोलापूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून कंटेनरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक तपास करमाळा पोलिसाकडून करण्यात येत आहे.