आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर रोडवर अपघात; दोघे मोटारसायकलस्वार ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी येथे व्हनसाळे पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि. 24) रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव ट्रकने मोटरसायकलस्वारांना उडवले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, ते विजापूरमधील इंडी तालुक्यातील आहेत.

सोमनाथ कामाटी, सुरेश माढेकर (रा. शिरनाळ, ता. इंडी) अशी मृतांची नावे आहेत. सोलापूरहून मोटारसायकलवरून (एम. एच. 13, एआर 8166) दोघेजण इंडीकडे जात होते. व्हनसाळे पेट्रोल पंपाजवळ आले असताना विजापूरहून सोलापूरच्या दिशेने येणार्‍या मालट्रकने (जीजे 1, बीवाय 5996) त्यांना जोराने धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे, हवालदार अशोक ढवळे, रवी माने घटनास्थळी धावले. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.