आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंशिस्तीतूनच कमी होतील अपघात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरात आठ दिवसात दहाजणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यात तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अपघातानंतर जनआंदोलन झाले. यामुळे पोलिस-प्रशासनाची नियोजन बैठक,विद्यार्थी व राजकीय पक्षांची आंदोलने झाली. गृहराज्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेऊन पोलिस आयुक्तांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांमध्ये वाहतूक नियोजनाची गंभीर चर्चा झाली. यातून एक सूर उमटला तो म्हणजे अपघाताला पोलिस हा एकमेव घटकच जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही तर रस्ते, वाहनांची स्थिती, आपली वैयक्तिक चूक ही कारणेही आहेत. पोलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करावी आणि नागरिकांनी आपली कर्तव्ये अर्थात वाहतूक नियम पाळावेत तरच अपघातावर नियंत्रण येईल.
शहरातून तीन महामार्ग जातात. त्यामुळे अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. शहरात एकही उड्डाणपूल नाही. रिंगराऊंड रस्ता नाही. वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी. त्याशिवाय वाहतूक नियोजनाचा अभाव. नागरिक वाहतूक नियम पाळत नाहीत. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई. शहरातील काही रस्त्यांचे दुहेरीकरण झाले तरी तीस ते चाळीसच्या गतीने वाहने जाऊ शकत नाहीत. शहरात काही ठिकाणी वन-वे आहे. समविषम तारखेस वाहने उभी करणे, नो पार्किंग झोन आहेत, त्याची अंमलबजावणी होत नाही आणि नागरिकही नियम पाळत नाहीत. आता खरी गरज आहे नागरिकांचे प्रबोधन करण्याची.
अनेक रिक्षांमधून ओव्हरसीट प्रवासी वाहतूक स्रुूच आहे. त्याला पोलिसांनी अद्याप तरी पायबंद घातलेला नाही. गर्दीच्या आणि महत्त्वाच्या चौकात नो पार्किंग झोन करणे, एकेरी मार्गाचा अवलंब करणे, सम-विषम तारखांना वाहने लावणे, फिरते पेट्रोलिंग पथक नेमणे गरजेचे आहे. नव्या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेला सूचना देणे यांचा पाठपुरावा व्हावा.
-शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी नो-पार्किंग झोन, अवजड वाहनांना पर्यायी रस्ता देणे याबाबत कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पळावेत. स्वयंशिस्त बाळगल्यास वाहतूक नियोजनात सुसूत्रता येईल आणि अपघात टळतील. प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त
-वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. चौकातून पुढे जाताना डाव्या-उजव्या बाजूला पाहा. इंडिकेटर, हातवारे करून आपण वळण्याची दिशा दाखवा. प्रत्येक ठिकाणी पोलिस असतीलच असे नाही. त्यावेळी आपण स्वत: वाहतूक नियम पाळा. रस्त्यावर वाळू, खड्डे पडल्याचे दिसल्यास वाहने थांबवून सावकाश पुढे जा. मोबाइलवर बोलणे टाळा.’’ गायत्री भट, गृिहणी
- विशेषत: तरुण-तरुणींनी वाहने चालवताना काळजी घ्यावी. महामार्गावर अवजड वाहनांच्या चालकांची वाहनपरवाना तपासावा.’’ प्रा. गंगाधर घोंगडे