आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विमानतळावर हंबरडा, हुंदके अन् अश्रू, अपघातग्रस्तांना विमानाने पाठवले विजयवाडाकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- कुणाच्याहाताला तर कुणाच्या डोक्याला जखमा झालेल्या, त्यांच्या रक्ताळलेल्या नजरेतून नियतीने मांडलेला हैदोस दिसत होता. कुणी आपले आप्त सोडून गेले म्हणून हंबरडा फोडत होते तर काही जण हुंदके आणि अश्रू गाळत आपला शोक व्यक्त करत होते. कुणाचा पती तर कोणाचा भाऊ मृत्युमुखी पडलेला, काही मिनिटाअगोदर असणारी सोबत आता कायमची दुरावली होती. कुणालाच काही सांगता येत नव्हते, सारेच जण स्तब्ध झालेले. नियतीच्या या घाल्यामुळे सोलापूर विमानतळावर केवळ सन्नाटा पसरला होता.
करमाळा- टेंभुर्णी मार्गावरील कविटगावजवळ झालेल्या भीषण अपघातात प्रवासी जागीच ठार तर १३ प्रवासी जखमी झाले.जखमीतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना करमाळ्याहून एसटीने सोलापूर विमानतळावर आणण्यात आले. या अपघातात जखमीना मंगळवारी दुपारी आंध्र प्रदेश सरकारने पाठविलेल्या विशेष विमानाने विजयवाडा येथे पाठविण्यात आले. अपघातातील मृत जखमी लोक आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील चिलकलपुरी येथील रहिवासी आहेत.
कविटगाव अपघातातील जखमी मंगळवारी दुपारी चार वाजता सोलापूर विमानतळावरून विमानाने विजयवाडाकडे रवाना झाले. अपघातात मृत पावलेल्याचे नातेवाईक जखमी सोलापूर विमानतळावर खिन्न अवस्थेत बसलेले होते.