आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • According To Police Give The Notification On Tannoy

नो-पार्किंग कारवाई, पोलिस मर्जीनुसार देतात ध्वनिक्षेपकावर सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मंगळवारी दुपारी दीडच्या सुमाराला दक्षिण तहसील कार्यालयाजवळील वाहतूक क्रेनवर काही दुचाकी उचलून नेण्यात आल्या. पंधरा मिनिटांनी तीच क्रेन आली. त्यापाठापोठ दुसरी क्रेन आली. तीनही वेळा माइकवरून सूचना देता थेट दोनवेळा दुचाकी उचलून नेण्यात आल्या. याबाबत क्रेनवरील पोलिसांना सूचनांबाबत विचारले असता, इथे शासकीय कार्यालये आहेत, माइकवरून बोलता येत नसल्याचे उत्तर दिले.
प्रश्न असा आहे ज्या ठिकाणावरून दुचाकी उचलण्यात आल्या, त्या ठिकाणी पांढरे पट्टे नाहीत, नो पार्किंग झोनचे फलकही नाहीत. महत्त्वाचे म्हणजे पंधरा मिनिटांत तीन वेळा क्रेन येऊन गेली. हीच शिस्त मुख्य रस्त्यांवर थांबून लावली असती तर नागरिकांना दिलासा मिळाला असता.
ठरावीक ठिकाणीच क्रेनद्वारे कारवाई होते. शहराची हद्द बारा किलोमीटर परिसराची. वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून एक-दोन किलोमीटर परिसरातच ही कारवाई चालते. म्हणजे जुना एम्प्लॉयमेंट चौक, सातरस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, न्यायालय परिसर, जुना होटगी नाका, डफरीन, दत्त चौक, नवीपेठ, पार्क चौक या पुढे क्रेन जात नाही. आतापर्यंतच्या या कारवाईमुळे वाहनधारकांना शिस्त लागली का? हाही महत्त्वाचा मुद्दा आहे.
क्रेनवर तेच-तेच कर्मचारी नेमण्यात येतात. मोक्याच्या पॉइंटला ठरावीक पोलिसच असतात. सिग्नल चौकात मात्र नियमित पोलिसांची अदलाबदल होते. मग सर्वांना समान नियम का नाही. नाही तर एका पोलिसाला आठ दिवस एकाच ठिकाणी नेमणूक द्या. नेमणूक देतानाही दुजाभाव केला जातोय.सिग्नल चौकात सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेचे नियोजन झालेच पाहिजे.
आयुक्तांनी लक्ष द्यावे
पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पदभार घेताना चाळीस टक्के काम वाहतूक नियोजनावर असेल असे सांगितले होते. वीस दिवसांत थोडेसे बदल दिसताहेत. पण आणखी जो गोंधळ आहे तो थांबला नाही. म्हणजे नियमित सिग्नल लावले जात नाहीत. आपल्या मर्जीनुसार चौकात नियोजन असते. सिग्नल नसल्यास मॅन्युअलव्दारे नियोजन नाही. शहरात फक्त सोळा सिग्नल चौक आहेत. किमान याठिकाणी नियोजन होत नाही?
क्रेन कारवाईत गोंधळ आहे. चारचाकींसाठी फक्त सहा जॅमर आहेत. वाहनांची संख्या पाच लाखाच्या घरात आहे. शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, नवी पेठ, मधला मारुती, सात रस्ता भागांत एकेरी मार्ग, नो पार्किंग झोन, दोन पाळ्यात पोलिस पाहिजेत. अवजड वाहने, वाळू वाहतूक ट्रकबंदी काळात शहरात येतात. अॅपेरिक्षा, रिक्षातून ओहरसीट प्रवासी वाहतूक सुरूच आहे. बिगर पासिंग रिक्षाही धावतात.
वाहतूकचा आराखडा तयार करत आहोत
- वाहतूक शाखेचा थोडासा गोंधळ आहेच. मी सक्षमपणे आराखडा तयार करतोय. लवकरच वाहतूक नियोजनात आणखी बदल दिसतील. त्यावर वर्कआऊट सुरू आहे.”
रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त