आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षाच्या मुलीवर दुष्कर्म करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आठवर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी एका तरुणाला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायधीश शब्बीर अहमद औटी यांनी ठोठावली. अभिजित ऊर्फ बबलू अविनाश कदम (वय २७, रा. दौंडे प्लॉट, दमाणी नगर) याला शिक्षा झाली आहे. वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्यातील पंधरा हजार रुपये मुलीला देण्याचे आदेश आहेत.
दमाणी नगरात ही घटना सव्वीस मार्च २०१३ रोजी घडली होती. पीडित मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली होती. ती मुलगी घराबाहेर खेळत असताना खाऊचे आमिष दाखवून घराजवळ थांबलेल्या कारच्या आडोशाला नेऊन तिच्यावर दुष्कर्म केल्याची घटना घडली होती. मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली. घटनेनंतर तरुणाने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
पीडितमुलीने दिली साक्ष
न्यायालयातखटला सुरू असताना पीडित मुलीने साक्ष दिली होती. तिची आई, वैद्यकीय डॉक्टर यांच्या साक्षीही महत्त्वाच्या ठरल्या. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम सहा नुसार दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सरकारतर्फे शीतल डोके, आरोपीतर्फे एम. बी. सोलनकर, खरात या वकिलांनी काम पाहिले.