आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड टाकतो, असे धमकावत एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी तरुणावर सदर बजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतनाम चौक येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी महावीर हायस्कूलमध्ये शिकत आहे. बुधवारी (दि. 7) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ती मुलगी आपल्या भावासोबत महावीर हायस्कूलपासून महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाकडे जात होती. दरम्यान, पवन विजय गायकवाड (रा. सतनाम चौक) याने त्या मुलीला पाहिले. तो पाठीमागून एका रिक्षा घेऊन आला आणि मुलीच्या भावासमोर रिक्षा उभी केली. तसेच, तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड टाकून टाकतो असे धमकावत त्या मुलीला जबरदस्तीने रिक्षात बसविले.

त्याने रिक्षा श्रीरेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ नेली आणि तेथील कठड्यावर मुलीशी अश्लिल चाळे केले. या प्रकरणातील आरोपी गायकवाड फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.