आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Action Against Bogus Snake Friend, Solapur Forest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्पतस्करांविरुद्ध नेमले पथक, भामट्या सर्पमित्रांविरोधात वनविभागाचे धोरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सर्पमित्र म्हणून फुशारकी मारणे, साप पकडल्यानंतर तो दुसरीकडे सोडण्यासाठी पैसे घेणे, सर्पमित्र म्हणून स्वत:च्या नावाने अवैध डिजिटल फलक लावून जाहिरातबाजी करणार्‍या भामटया सर्पमित्रांवर वनविभागातर्फे वन्यजीव कायद्यान्वये कारवाई होईल. तसेच, सापांचे विष काढून त्याची तस्करी करणार्‍या टोळींचा छडा लावण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती, उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी दिली.
शहर व ग्रामीण भागामध्ये भामट्या सर्पमित्रांची संख्या वाढलीय. काहींनी पैसे कमवण्याच्या उद्देशाने साप पकडण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी काही चौकांमध्ये स्वत:चे सापांबरोबरच्या फोटोंचे डिजिटल लावून त्याद्वारे जाहिरातबाजी सुरू केलीय. त्या स्वयंघोषित सर्पमित्रांच्या मोबाइलवर संपर्क साधून कुणी बोलावले की, ते भामटे घटनास्थळी जातात. साप पकडल्यानंतर एका हातातील पिशवीमध्ये साप अन् दुसर्‍या हाताने तो पकडल्याबद्दलचे पैसे मागतात. तुमच्यासाठी माझ्या हातातील काम बाजूला ठेवून आलोय, असे सांगत 500 ते 1500 रुपये मागण्यात येतात. पैसे देण्यास कुणी नकार दिल्यास, काहीप्रसंगी तोच साप तिथेच सोडून देण्याचा इशारा देतात. त्या भामट्यांमुळे सापांना वाचवण्यासाठी धडपडणार्‍या व कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवणार्‍या प्रामाणिक सर्पमित्रांना याचा फटका बसतोय.
‘दिव्य मराठी’ (24 ऑगस्ट) डीबी स्टारमध्ये याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल वनविभागाने घेतली. सर्पमित्र म्हणून जाहिरातबाजी करता येत नाही. पण, शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सापांबरोबर स्वत:च्या छायाचित्रांसह काही भामट्या सर्पमित्रांनी डिजिटल लावले आहेत. त्यांचा शोध घेऊन सर्व अनधिकृत डिजिटल लावणार्‍यांवर वन्यजीव कायदा 1972 अन्वये गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला, सर्व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना दिला.
सापांना पकडून त्यांचे विष काढण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत पोलिसांबरोबर टायगर सेल (व्याघ्र कक्ष) समितीच्या बैठकीत त्यावर कठोर निर्णय होईल. तसेच, विषाच्या तस्करीचा छडा लावण्यासाठी स्वतंत्न पथक नियुक्त केले. त्यांना काही माहिती मिळाली असून, त्याद्वारे चौकशी सुरू केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

जाहिरातबाजीस मनाई
वन्यजीव अनुसूची दोन व चारमध्ये आहे. सापांना पकडणे, जवळ बाळगणे, त्यांची हत्या करण्यास वन्यजीव कायद्यान्वये बंदी आहे. सर्पमित्र म्हणून डिजिटल लावणे, संघटना काढणे, जाहिरातबाजी करणार्‍यांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर वन्यजीव कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील. साप पकडल्यानंतर तो सोडण्यासाठी कुणी पैसे मागितल्यास त्वरित वनविभागाला कळवावे.’’ किशोर ठाकरे, उपवनसंरक्षक, सोलापूर