आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिक्रमणांवर कारवाई न केल्याप्रकरणी मालमत्ता अधीक्षक पाणीभातेंवर ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - भूमी व मालमत्ता कार्यालयाच्या कामकाजावर व सेवकांवर नियंत्रण न ठेवणे, महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये याची दखल न घेतल्याप्रकरणी मनपाचे भूमी व मालमत्ता अधीक्षक चंद्रशेखर केशव पाणीभाते यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 चे कलम 4 (2) (अ) दोन नुसार ही निलंबन कारवाई झाली आहे.


भूमी, मालमत्ता अधीक्षक पाणीभाते निलंबित महापालिका मालकीच्या मिळकती, इमारती, शॉपिंग सेंटर, भूखंड, महापालिका सेवकांची निवासस्थाने वगैरे मालमत्ता कोठे कोठे आहेत, याबाबतची अद्यावयत माहिती ठेवणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, जागा हस्तांतरित करणे, त्यांचे मूल्यांकन घेणे, अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित अतिक्रमण काढण्याबाबत मान्यता घेऊन अतिक्रमण विभागास कळविणे, महापालिका जागेत अथवा इतरत्र अनधिकृत खोकी पडणार नाहीत याची दक्षता घेणे अशी जबाबदारी सोपविलेली आहे. परंतु ती पार न पाडल्याने कार्यालयीन शिस्त व नागरी सेवा वर्तणूक नियमाचे उल्लंघन झाले असल्याचे नोटिसीत नमूद केलेले आहे.


यांनी केलंय अतिक्रमण
प्रभाग क्रमांक 16, रविवार पेठ : संजीव धडके, रामचंद्र वीटकर, कोंचारकर, वसंत शिंदे, राम दांडगे, तुळशीदास या सर्वांनी अतिक्रमण करून पत्राशेड मारले आहे.
मनपा प्रशाला क्र. 16, वॉर्ड ऑफिस समोर : मारुती क्षीरसागर, भाग्यवंती शिंदे.
जुना अक्कलकोट नाका : इंडिया चिकन सेंटर, ए. एन. चिकन सेंटर, दूध पंढरी, डायमंड मोबाइल शॉपिंग, नागेश गुजराती, बालाजी मंगोडेकर,


पाणी टाकी : संजय धडके, सुमन शिंदे यांचे अतिक्रमण आहे.
निष्काळजीपणामुळे ही अतिक्रमणं झाली आहेत. त्यामुळे ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी आहे. त्यामुळे पाणीभाते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, अशी माहिती आयुक्त गुडेवार यांनी दिली.