आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Taken On 22 Mandal In Solapur On Ambedkar Jayanti Day

डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूक : डॉल्बीचा गोंगाट, बावीस मंडळांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोप मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिमचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेवल्याप्रकरणी २२ जयंती उत्सव मंडळांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस प्रशासनाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
पर्यावरण अधिनियमाने ध्वनिक्षेपकाची कमाल मर्यादा ७५ डेसिबल आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून मंडळाचे अध्यक्ष, वाहनचालक वाहनांवर हे गुन्हे नोंदविले आहे. यात कुणालाही अटक झालेली नाही.

गुन्हे नोंदविण्यात आलेली मंडळे अशी : भीमशक्ती सामाजिक बहुउद्देशीय सेवा मंडळ, एमआयडीसी, अध्यक्ष - अर्जुन कांबळे, भीमक्रांती तरुण मंडळ, एमआयडीसी, अध्यक्ष - विकी सोनवणे, पंचशील तरुण मंडळ, रामलाल चौक, अध्यक्ष - सचिन शिंदे, मुरारजी प्रतिष्ठान, रामलाल चौक, अध्यक्ष - रणधीर रंगाळे, बुद्धदर्शन तरुण मंडळ, नवीवेस चौकी, अध्यक्ष - संतोष डोळसे, सामाजिक संस्था, पार्क चौक, अध्यक्ष - आप्पा रेवणसिद्ध बागले, देविदास हिरामंत कारंडे, फौजदार चावडी, छत्रपती शाहुराजे मंडळ, एसटी स्टँड, अध्यक्ष - राज डोळसे, कपिल तरुण मंडळ, सदर बझार, अध्यक्ष - प्रतिक शिंगे, न्यू संघरक्षित मंडळ, सात रस्ता, अध्यक्ष - पंकज ढसाळ, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, रंगभवन चौक, अध्यक्ष - नितीन कांबळे, सिद्धार्थ मंडळ, रंगभवन चौक, अध्यक्ष - साजन हावळी, मातोश्री रमाबाई मंडळ, सिद्धार्थ चौक, अध्यक्ष - गौतम सावंत, संघमित्र मंडळ, मौलाली चौक, अध्यक्ष - धीरज शिवशरण, तक्षशिला मंडळ, उजनी कार्यालयासमोर, अध्यक्ष - विनोद गायकवाड, पंचशील मंडळ, सदर बझार, अध्यक्ष - पवन सरवदे. सुभेदार रामजी तरुण मंडळ, बुधवार पेठ, दि बबन भंडारे कला सांस्कृतिक मंडळ, जी. एम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था आंबेडकर जयंती मंडळ, जीएम चौक, पी. बी. ग्रुप मंडळ, बुधवार पेठ, रॉकी प्रतिष्ठान, दमाणी नगर, रमांजली तरुण मंडळ आदी. एकूण २२ मंडळे होतात.

माणसांसहित इमारतीच्या भिंती हादरल्या

मिरवणूक रविवारी निघाली होती. ती रात्री बारानंतर संपली. विविध मंडळांनी सजावटीसह ध्वनिक्षेपकावर गाणी लावली होती. काही मंडळांनी अत्युच्च ध्वनी निर्माण करणाऱ्या डॉल्बी सिस्टिमवर गाणी वाजवली. त्याच्या प्रचंड आवाजामुळे निर्माण झालेल्या कंपनाने माणसांसहित इमारती हादरत होत्या. वेळीच आवाज कमी लावण्यास सांगण्याऐवजी पोलिस प्रशासनाने नेहमीप्रमाणे गुन्हा घडून गेल्यावर शौर्य दाखवून दप्तरी कार्यवाही केली.