आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समानता येणार नाही तोवर वाढते घटस्फोट कमी होणे शक्य नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बदलत्या समाजातील स्त्री मत मांडायला लागली आहे. विवाह संस्थेत इतकी वर्षे निमुटपणे सर्व सहन करणारी ती आता बदलतेय. यामुळे पुरुषांचे स्थान डळमळीत होताना दिसत आहे. स्त्रीच्या या बदलत्या रुपामुळेच देशातील घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. समाजात समानता येणार नाही तोवर हे असेच घडत राहणार, असे मत अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अँम्फी थिएटरमध्ये जव्हेरीच्या स्मृती व्याख्यानमालेत शोभा बोल्ली व शिरिष देखणे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

जबाबदार आपणच
कुणीही उठतो आणि म्हणतो की राजकारण चांगले नाही. असे म्हणण्यापूर्वी आपण काय जबाबदारी पार पाडतो ते पाहवे. राजकारणात पोकळी निर्माण झाली की ती अयोग्य व्यक्ती भरते. त्या ठिकाणी आपल्यातीलीच एक योग्य व्यक्ती गेली तर काय बिघडते, असा प्रश्न कुलक र्णी यांनी केला.