आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेसृष्टीसह सामाजिक जाण असणारा माणूस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सदाशिव अमरापूरकर आणि सोलापूरचे एक वेगळे नाते होते. येथील साहित्य, नाटकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे काम त्यांनी केले. ज्येष्ठ समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख यांनी लिहिलेल्या ‘बखर एका राजाची’ या कादंबरीवर त्यांनी नाटक बसवले. थेट इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी)मध्ये नेले. ही फार मोठी गोष्ट होती. नीना कुलकर्णी, विनाद जोशींसारखे कलावंत त्यात हाेते. त्यामुळे त्यांनाही प्रचंड लोकप्रियता िमळाली. सोलापूरच्या कलेला उंची देणारे हे व्यक्तिमत्व हरपले आहे.
अमरापूरकर नगर जिल्ह्यातले. राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून ते नाटकात आले. त्यानंतर मुंबईच्या िहंदी चित्रसृष्टीत प्रवेश केला. एक मराठी माणूस कुठे जाऊ शकतो आणि काय करू शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सदाशिव अमरापूरकर. हिंदी चित्रपटांना आगळा खलनायक देण्याचे कामही त्यांनी केले, हे त्याहूनही विशेष. एक चरित्र अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत आगळे रूपडे प्रेक्षकांसमोर आणतो, हे एक प्रकारचे आव्हानच होते. परंतु अशा भूमिकांना त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला, असेच म्हणावे लागेल.
अमरापूरकर नेहमी सोलापूरला यायचे. येथील हेमंत वर्तक त्यांचे जीवलग िमत्र होते. त्यांच्या समवेत अमरापूरकर कलावंतांची भेट घ्यायचे. काही नाट्य स्पर्धांना त्यांनी भेटही दिली असल्याचे उदाहरणे आहेत. कलाकाराला कलेच्या पैलूंशिवाय एक सामाजिक अंग असतो, हे त्यांनी स्वत:पासून दाखवून दिले. अंधश्रद्धानिर्मूलनाचे काम असो, की इतर सामाजिक काम त्यात कलावंताची जबाबदारी मोठी असते, हे त्यांनी पटवून दिले. त्यामुळेच त्यांच्यातील कलेइतकेच सामाजिक जबाबदारीची भूमिकाही उठून दिसली.