आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Usha Jadhav, Latest News In Divya Marathi

स्टार लेकींच्या माय आज येणार सोलापूरच्या भेटीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रीय पुरस्कारविजेती अभिनेत्री उषा जाधव आणि ‘तारे जमींपर’ या हिंदी चित्रपटातील गोड मराठी अभिनेत्री गिरिजा ओक या दोन स्टार अभिनेत्रींसह त्यांच्या ग्रेट मम्मांना भेटण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे. ‘मधुरिमा’ क्लबच्या वतीने हा योग साधला आहे. ‘दिव्य मराठी’च्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त या स्टार कलावंत रसिकांशी संवाद साधणार आहेत.
रविवारी (दि.23) सायंकाळी 5 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. या वेळी गिरिजा ओक व तिची आई पद्र्मशी फाटक तसेच उषा जाधव व तिची आई मंगला जाधव या मायलेकी मुक्त संवाद साधणार आहेत. या वेळी ओक आणि जाधव यांच्या बालपणापासून ते अभिनेत्री बनण्यापर्यंतचा प्रवास उलघडणार आहे. या अभिनेत्रींच्या जडणघडणीत त्यांच्या आईची असलेली भूमिका या विषयावर त्यांचे अनुभव रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. उत्तरा मोने या मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमात या अभिनेत्रींशी मुक्त संवाद साधण्याची संधीही प्रेक्षकांना लाभणार आहे. रसिकांना कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खास महिलांसाठी
‘माय लेकी’ हा कार्यक्रम खास ‘दिव्य मराठी’च्या महिला वाचकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ‘दिव्य मराठी’च्या सर्व महिला वाचकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले.