आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरात अतिरिक्त शिक्षकांवर येणार उपासमारीची वेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शालार्थ प्रणालीनुसार डिसेंबरपासूनची वेतन प्रक्रिया होणार आहे. यामध्ये केवळ मान्यताप्राप्त शिक्षकांची माहिती गोळा करण्यात आली आहे. अतिरिक्त शिक्षकांची माहिती घेतली जात नसल्याने त्यांचा पुढील महिन्याचा (जानेवारी) पगार मिळणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 130 शिक्षकांवर पुढील महिन्यापासून उपासमारीची वेळ येणार आहे.
जिल्ह्यात खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण 130 अतिरिक्त शिक्षक आहेत. मान्यता मिळालेल्या शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये भरण्यात यावी, अतिरिक्त शिक्षकांची कोणतीही माहिती घेऊ नये, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी वेतन कार्यालयाला दिले आहेत.
निर्णयानुसार प्रक्रिया
शिक्षण उपसंचालकांनी पत्राद्वारे आदेश दिले आहेत. ज्या शिक्षकांची पदे मंजूर आहेत, त्याच शिक्षकांची माहिती शालार्थ प्रणालीत घेण्यात आली आहे. ज्या शिक्षकांचे पद मंजूर नाही, त्यांची महिती घेण्यात आली नाही.
-प्रकाश मिश्रा, वेतन अधीक्षक
सुवर्णमध्यचा प्रयत्न
जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न आहे. मात्र, शालार्थ प्रणालीमध्ये त्यांचा समावेश नसेल. काही सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- मदारगणी मुजावर, उपशिक्षणाधिकारी
शालार्थ प्रणाली राबवल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार वेतन दिले जावे. निर्णय त्वरित घ्यावा.
- सुनील चव्हाण, युवक शिक्षक कर्मचारी