आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषोत्तम मासात करा उपवास ; 16 सप्टेंबरपर्यंत व्रत करण्याचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- दर तीन वर्षांनी कोणता तरी महिना अधिक येतो. त्यालाच ‘अधिक मास’ म्हणतात. यंदा 18 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत अधिक मास आहे. या मासाची देवता भगवान श्रीकृष्ण असल्याने त्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हणतात. या मासात महिनाभर उपोषण अथवा अयाचित करण्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
श्राद्ध, स्नान व दान ही तीन कर्मे प्रामुख्याने या महिन्यात होतात. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासह अनेक पुण्यफल देणारा हा महिना आहे. भगवान विष्णूंचे स्मरण केल्यास मुक्तीचा मार्ग सापडू शकतो. त्यासाठी विष्णुसहस्रनामाचे पठण, गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन केले जाते.
गतवर्षी भाद्रपद महिन्यात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध अधिक भाद्रपद मासात त्या तिथीस करावे. यापूर्वीच्या अधिक भाद्रपद मासात ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचे दरवर्षीचे श्राद्ध अधिक भाद्रपदातच करावे. मात्र, दरवर्षीचे भाद्रपद मासात ज्यांचे श्राद्ध असेल त्यांचे नियमित श्राद्ध या वर्षी निज भाद्रपद मासात त्या तिथीस करावे, असे दाते
यांनी म्हटले आहे.
अधिक मासात हे करा
उपोषण : महिनाभर खाऊ नका. फलाहार घ्या
अयाचित : भोजनसमयी मिळेल ते खा
एकभुक्त : माध्यान्ही एक वेळ भोजन घ्या
नक्तभोजन : दिवसा उपोषण, रात्री भोजन घ्या
मौनभोजन : भोजनाच्या वेळी काही बोलू नका
धार्मिक : विष्णुयाग, सत्यनारायण महापूजा करा
असा येतो अधिक मास
- दर तीन वर्षांनी कोणता तरी महिना अधिक मास म्हणून येतोच; त्यामध्येही सामान्यत: 28 ते 35 महिन्यांतही अधिक मास येऊ शकतो. दर 19 वर्षांनी पुन्हा तोच महिना अधिक मास येतो. यानंतर 2031 मध्ये अधिक भाद्रपद येईल.’’- मोहन दाते, पंचांगकर्ते
या अफवाच
- मकर संक्रांतीप्रमाणे अधिक मास चांगला नाही.
- अधिक मासात वाण, दान, अन्नदान करू नये.
- अधिक मास जावई, सुनेला वाईटच असते.