आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदित्य ठाकरे, गो-हे यांच्या सोलापुरात सभा,शहर मध्यमधील महेश कोठेंसाठी नाही सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शिवसेनेच्यायुवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे 13 ऑक्टोबरला सोलापूरला येत आहेत. शुक्रवारी ज्येष्ठ नेत्या, आमदार नीलम गोऱ्हे येत आहेत. दोन्ही नेते उत्तर किंवा दक्षिण सोलापूर येथील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. मात्र, शहर मध्यमध्ये नेत्याच्या सभेचे नियोजन नसल्याचे दिसते. येथून पक्षाचे उमेदवार महेश कोठे रिंगणात आहेत.
आदित्य ठाकरे सोलापूर दक्षिण मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार गणेश वानकर यांच्या प्रचारासाठी येत असून त्यांच्या सभेची वेळ ठिकाण निश्चित झाले नसल्याची माहिती, जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांनी दिव्य मराठीला दिली. आदित्य ठाकरे यांच्यासोबत आदेश बांदेकरही येत आहेत. तेही वानकर यांच्याच प्रचारासाठी येत आहेत.उद्या शुक्रवारी ज्येष्ठ नेत्या नीलम गो-हे सोलापुरात आहेत. त्यांच्या दोन ठिकाणी सभा होणार आहेत. श्री. वानकर यांच्या प्रचारासाठी होटगी गावात सायंकाळी वाजता सभा होणार आहे. तर सायंकाळी सातला उत्तर सोलापूरमधील उमेदवार उत्तम प्रकाश खंदारे यांच्या प्रचारासाठी जोडभावी पेठेतील येरनाळकर हॉल येथे सभा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.