आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुल्क आकारता नर्सरी प्रवेश द्या, प्रशासनाधिका-यांच्या प्रा.शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार २५ टक्के प्रवेश कोट्यांतर्गत पूर्व प्राथमिकचेही प्रवेश विनाशुल्क द्यावे लागणार आहेत. २५ टक्के कोट्यांतर्गत विनाशुल्क प्रवेश देणे शाळांना बंधनकारक आहे, शासन मात्र या विद्यार्थ्यांचे पहिलीपासूनचे शुल्क देणार आहे. त्यामुळे एलकेजी यूकेजी या दोन वर्षांसाठीचे शुल्क कोण भरणार यावरून संभ्रमावस्था आहे.
२५ टक्के प्रवेश प्रक्रियेमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि संघटना यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर पहिलीपासून प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय शासनाने नुकताच काढला. यानुसार पहिलीपासूनचे २५ टक्के प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार असले तरी याच विद्यार्थ्याला पूर्वप्राथमिकसाठीचे शुल्क भरावे लागणार होते. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांनी सोमवारी शिक्षण मंडळ सभागृहात बैठक घेतली. त्यात पालकांकडून कोणत्याही प्रकारची फी घेता शाळांनी प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना त्यांनी बैठकीद्वारे दिली आहे.
पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण
मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयाला स्थगिती दिली. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शासनाने याबाबतचे स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक होते. पुढील महिन्यात पूर्व प्राथमिक प्रवेशाची फी घ्यावी, की नाही याबाबत सुनावणी होणार आहे. मात्र पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
इम्रान सगरी, आरटीई कार्यकर्ता
विनाशुल्क प्रवेश द्यावेत
शाळांनी २५ टक्के प्रवेश कोणत्याही प्रकारचे शुल्क घेता प्रवेश देण्यात यावे. शासनाचा निर्णयावर सध्या स्थगिती आली आहे. त्यामुळे ज्यांना ऑनलाइन लॉटरीप्रमाणे प्रवेश मिळाला आहे. त्याप्रमाणे प्रवेश देण्यात यावेत.
विष्णू कांबळे, प्रशासनाधिकारी, शिक्षण मंडळ
शाळांची मनमानी सुरूच
पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू असताना मध्येच शासनाने निर्णय काढून घोळ घातला आहे. आता काही शाळा प्रवेश देण्यास नकार देत आहेत, यावर प्रशासनाधिकारी यांनी प्रवेश नाकारणा-या शाळांवर कारवाई करणे गरजेचे आहे, मात्र ते करीत नाहीत.
-शाम वाघमारे, आरटीई कार्यकर्ता
बातम्या आणखी आहेत...