आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन म्हणते आलबेल, पालकांचा मात्र आक्षेपच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नूमवि प्रशालेत सोडत काढताना महिला मुलगा.
सोलापूर- शिक्षण हक्क कायदा अंतर्गत केजी ते पहिलीसाठी २५ टक्के आरक्षणांतर्गत दुर्बल वंचित घटकांसाठी राबवण्यात आलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली झाली आहे. २८ एप्रिल रोजी नूतन मराठी विद्यालय सभागृह, ज्ञानप्रबोधिनी प्रशालेजवळ सकाळी १० वाजता लॉटरी काढण्यात काढण्यात आली. ही प्रक्रिया पारदर्शक झाल्याचा दावा प्रशासनाने केला तर दुसरीकडे या प्रक्रियेवरच पालकांनी आक्षेप घेतला. दरम्यान, बुधवारी पात्र अर्जदारांच्या शाळानिहाय यादी लावण्यात येणार आहे.

ही प्रक्रिया १६ मार्चपासून ऑनलाइन सुरू झाली. यासाठी एकूण अर्ज १५४४ आले होते. त्यापैकी ४२३ अर्ज पात्र ठरले तर ११२१ अर्ज अपात्र दर्शविण्यात आले आहेत. आरक्षित प्रवेशांची संख्या ५०० च्या जवळपास आहे. शहरातील २३ खासगी शाळांमध्ये आरक्षण आहे. आज सोडत काढण्यात आली.

अर्जदारांना अॅटो मेसेज
कॉम्प्युटररॅडमली सिलेक्शन पध्दतीनुसार उपलब्ध झालेले क्रमांक संगणकात फिडिंग केले आहेत. त्यानंतर संगणकाव्दारे प्रवेशाची सोडत काढण्यात आली. पात्र ठरलेल्यांना अॅटो मेसेज देण्यात आला.

योग्य पद्धतीने सोडत झाली
आज सगळ्यांसमोर पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच जे पात्र आहेत त्यांना तसा मेसेज गेला आहे. विष्णूकांबळे, प्रशासनाधिकारी

प्रक्रिया अर्धवट झाली आहे
आजची सोडत योग्य पद्धतीने झालेली नाही. एक किलोमीटरच्या आत असणाऱ्यांना आज प्रवेश देणे गरजेचे होते. ही पद्धत पालकांसमोर होणे गरजेचे होते, तसे झालेले नाही. जे अपात्र झाले त्यांना निरोप दिला गेला नाही. आरटीआय अॅक्टनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश घेत असताना त्यांना कोणत्याही पुराव्याअभावी प्रवेश नाकारता येत नाही, पण तसे झाले आहे. शाम वाघमारे, पालक