आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Administration Work Stop Coz Of Fund, Issue At Solapur, Divya Marathi

काम रखडले : प्रस्ताव देऊनही शासनाकडून मंजुरी नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संपूर्ण जिल्ह्याचा गाडा हाकणार्‍या महसूल भवनसाठी सात रस्ता येथे सुसज्ज इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, गेल्या 5 वर्षांत महसूल भवनचे फक्त 60 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणखी 6 कोटी रुपयांची गरज आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वाढीव निधी मिळण्याचा शासनाकडे प्रस्ताव दिला असला तरी त्याकडे अद्याप गांभीर्याने शासन पाहत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा कारभार पाहणार्‍या महसूल भवनसाठी निधी उपलब्ध होत नाही, हे सुद्धा एक आश्चर्यच म्हणावे लागेल.

महसूल भवन इमारतीचे भूमिपूजन मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी (2009) दोन केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पार पडले. पाच वर्षांत सुरुवातीला मिळालेल्या निधीवरच भवनचे बांधकाम झाले. त्यानंतर भवनच्या मूळ किमतीत 5.50 कोटीवरून 11.80 कोटी इतकी वाढ झाली. सुधारित दरास मान्यताच मिळाली नसल्याने निधी मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे येत्या वर्षभरात तरी महसूल भवनची इमारत उपलब्ध होईल का? याविषयी प्रश्‍ननचिन्हच आहे.
निधी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2013 मध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. याविषयी पाठपुरावा करूनही याकडे लक्ष देत नसल्याचे अधिकारी खासगीत बोलताना सांगतात. राजकीय वजन असल्यास निधी उपलब्ध होण्यास वेळ लागणार नाही. मात्र, यावर एकाही लोकप्रतिनिधीने याविषयी पाठपुरावा केला नाही.
निधी मिळाल्यास सहा महिन्यांत काम पूर्ण
महसूल भवन बांधकामासाठी निधी नसल्याने सध्या बांधकाम बंद आहे. 60 टक्के काम पूर्ण असून 40 टक्के काम शिल्लक आहे. निधी उपलब्ध झाल्यास सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’ पी. शिंदे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
महसूल भवन बांधकामास प्रतीक्षा शासनाच्या निधीची