आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमी अधिग्रहण विधेयक शेतकऱ्यांना संपवू पाहतेय, अॅड. सदाफुले यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भूमी अधिग्रहण विधेयक आणून केंद्र सरकार शेतकऱ्यांना संपवू पाहत आहे. सरकारिवरोधात बसपने देशव्यापी आंदोलन सुरू केले. त्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव अॅड. संजीव सदाफुले यांनी केले. या विधेयकाच्या विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशाल धरणे आंदाेलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी अॅड. सदाफुले म्हणाले, "केंद्रातील भाजप आघाडी सरकारला वर्ष पूर्ण झाले. पण निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले. उलट शेतकरी, दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात धाेरणे राबवण्यास सुरुवात केली. त्यातील पहिला टप्पा म्हणजे भूमी अधिग्रहण विधेयक. शेतकऱ्यांच्या जमिनी सहज लाटून भांडवलदारांच्या घशात टाकण्याचा हा डाव आहे. त्याच्या विरोधात बसपने देशव्यापी संपाची हाक दिली. राज्य सरकारही शेतकरीविरोधीच आहे. गोवंशहत्या बंदी करून शेतकऱ्यांकडील भाकड गाईंचा मोठा प्रश्न उभा केला आहे. दुष्काळी स्थितीत जनावरांना पोसणे कठीण होते. त्या वेळी हे पशुधन विकण्याची वेळ येते. जगण्याचा हा मार्गही राज्य शासनाने बंद करून टाकला.'
पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत लोकरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक बबलू गायकवाड, अशोक जानराव आदींची या वेळी भाषणे झाली. त्यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. या वेळी देवा उघडे, सुहास सुरवसे, नागेश माने, विठ्ठल आरेनवरू, मिलिंद बनसोडे, प्रशांत धाईंजे, रमेश धाईंजे, महादेव कदम, गणेश िशंदे, सिद्धार्थ लोकरे, श्रीकृष्ण प्रक्षाळे आदी उपस्थित होते.
या ठेवल्या मागण्या
भूमी अधिग्रहण विधेयक तातडीने मागे घ्यावे
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी
केंद्र राज्याने जनताविरोधी धोरणे रोखावीत
दलितांवरील वाढत्या अत्याचाराला आळा
बातम्या आणखी आहेत...