आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advance Radio System At Solapur Airport To Be Installed Soon

विमानतळासाठी दूरसंपर्क यंत्रणा दाखल, महानगरातील विमानतळाशी होईल संवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- होटगी रस्त्यावरील सोलापूर विमानतळाची पुनर्बांधणी जोरात सुरू आहे. संपर्कासाठी लागणारी अत्याधुनिक दूरसंवेदी यंत्रे दाखल झाली आहेत. याच्या माध्यमातून वैमानिकाशी थेट संपर्क साधता येणार आहे. तसेच, देशातील प्रमुख शहरांमधील विमानतळांशी थेट संपर्क साधता येणार आहे. येत्या महिनाभरात ही यंत्रणा सुरू होईल.

एअर ट्रॅफिक कंट्रोलसह नॉन डायरेक्शनल बीकन ही रेडियो यंत्रणा मुंबईतून आलेली आहे. सुमारे 30 लाखांची ही यंत्रणा आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ही सुविधा सोलापूर विमानतळासाठी देण्यात आली आहे. खासगी हवाई वाहतूक सध्या विमानतळाच्या नकाशावरून केली जाते. वैमानिक अनुभवाच्या आधारेच विमान उतरवतो किंवा हवेत झेपावतो.

हवाई नियंत्रण यंत्रणेचे कार्य

शहरापासून 200 किमी उडणार्‍या विमानाच्या, हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांशी सहज संपर्क साधता येईल. विमान कुठे चालले आहे यापासून विमानात कोण बसले आहे याची माहिती घेता येईल. दुसर्‍या शहराकडे निघालेल्या विमानासंदर्भात संबंधित विमानतळाला थेट माहिती देता किंवा घेता येईल.

विमानतळ झाले कुल
सोलापूरचे तापमान लक्षात घेता उन्हाळ्यात विमानतळावर खूप गरम होते. हे लक्षात घेऊन सोलापूर विमानतळ प्रशासनाने व्हीजिटर्स एरियामध्ये दोन एसी बसविले आहेत. तसेच, इमारतीच्या उर्वरित भागातही एसी बसविण्यात येणार आहे.

दूरसंपर्क यंत्रणा
हवाई नियंत्रण यंत्रणा (एअर ट्राफिक कंट्रोल) कोलमडल्यास त्यास पूरक म्हणून दूरसंवेदी यंत्रणा (नॉन डायरेक्शनल बीकन) काम करू शकेल. वैमानिकांशी संपर्क साधण्याचे काम करते. यामुळे वैमानिक सहज विमान, हेलिकॉप्टर्स उतरवू किंवा उड्डाण करू शकतो.