आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरची कन्या करतेय जाहिरात विश्वावर राज्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर -चेन्नईतून भरतनाट्यमचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्या सोलापूरच्या सुप्रिया खरातने हॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रेनॉल्ट निसान यांच्या जाहिरातीत काम करून सोलापूरचे नाव उज्वल केले आहे. जागतिक स्तरावर वाचल्या जाणार्‍या विविध मासिके आणि साप्ताहिके यांत तिचे छायाचित्र लवकरच झळकणार आहे. पारंपरिक भारतीय तरुणीची विविध प्रकारच्या छायाचित्रांच्या शोधात असणार्‍या रेनॉल्ट यांनी आपल्या पहिल्याच कटाक्षात सुप्रिया खरात या सोलापूरच्या तरुणीची निवड केली. तिच्या मुद्रा आणि नृत्याच्या सर्वांग ज्ञानाने तिने ही जाहिरात उत्तमरीत्या साकार केली आहे. तिच्या या जाहिरातीचे जून महिन्यात प्रकाशन होणार आहे.
असे मिळाले काम
सुप्रिया सध्या पीएच.डी.साठी चेन्नईच्या अन्नामलाई विद्यापीठात शिकते आहे. आपले शिक्षण सुरू असतानाच तिने फ्रान्सचे विख्यात इंटेरिअर डिझायनर जीन फ्रॅन्कॉइस लिसेज यांच्याकडे वस्त्रकला या फ्रेंच कंपनीची डिझाइन डेव्हलपर मॅनेजर म्हणून काम करत आहे. तिथे तिला दिग्दर्शक रेनॉल्ट यांच्या सहाय्यकाने पाहिले. ‘तुझा लुक टिपिकल भारतीय तरुणीचा आहे. तू आमच्या पुढच्या कामासाठी मॉडेल म्हणून काम करशील का’, अशी विचारणा त्याने केली. त्यावर सुप्रिया हिने क्षणाचाही विलंब न करता मॉडेल म्हणून काम करण्यास होकार दिला. त्यानंतर देशातील विविध महत्त्वाच्या स्थळांवर जाऊन तिची छायाचित्रे काढण्यात आली. भरतनाट्यममध्ये एमए आणि पुढे नृत्यावरच पीएच.डी. करणार्‍या सुप्रियासाठी ही एक अनोखी संधी होती. तिच्या करियरला यामुळे एक प्रकारची झळाली मिळाली आहे. तिच्या या यशाबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
माझ्यातील शिकण्याच्या वृत्तीला वाव मिळाला
जगातील सगळ्यात मोठय़ा जाहिरात दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी आल्याने मी क्षणाचाही विलंब न करता हो म्हणाले. त्याने माझ्यातील शिकण्याच्या वृत्तीला अधिक वाव मिळाला. शूटच्या वेळेस अनेक नव्या गोष्टी शिकले. सोलापूर ते चेन्न्ई आणि आता हा अनोखा प्रवास याने मला एक नवा अनुभव घेता आला. त्याचा खूप आनंद झाला. जाहिरात हे बदलणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात वावरताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवावा लागतो, असे ती म्हणाली.