आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Marriage Party Girl Face Non Human Behavior

साखरपुड्यानंतर तरुणीवर दुष्कर्म; गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - एका तरुणीसोबत साखरपुडा झाल्यानंतर दुष्कर्म करून दुसर्‍या तरुणीशी विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणासह सहा जणांवर एमआयडीसी पोलिसात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीने फिर्याद दिली. ‘त्या’ तरुणाचा बुधवारी पुण्यात विवाह होणार होता. तो विवाह झाला नसल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.

अमित गुलाब शिंदे, लता गुलाब शिंदे, गुलाब शिंदे, रेणुका भावळे, सोनाली भावळे, कुंदन भावळे (रा. नई जिंदगी, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पीडित तरुणीचा अमितसोबत साखरपुडा झाला होता. यानंतर तरुणीसोबत त्याने दुष्कर्म केले. अन्य पाचजणांनी मदत केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तो तरुण दुसर्‍या तरुणीसोबत बुधवारी पुण्यात विवाहबद्ध होणार होता.

पीडित तरुणीने फिर्याद दिल्यानंतर तपास अधिकारी श्रीमती जाधव व त्यांच्या पथकाने पुण्यात जाऊन माहिती घेतली. पुणे पोलिसांची मदत घेऊन तपासणी केल्यानंतर विवाह झाला नाही. तसेच सर्वजण गायब झाल्याचे जाधव यांनी सांगितले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर खरा प्रकार उजेडात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.