आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याच्या प्रतीक्षेनंतर हलक्या सरींसोबत आला पावसाळा, 18.5 मि.मी.ची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी शहर व जिल्ह्यात ख-या अर्थाने पावसाळ्याची सुरुवात झाली. दुपारपासून काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक ढगांची गर्दी झाली आणि हलक्या सरींनी पावसाचे आगमन झाले.
सायंकाळी साडेआठवाजेपर्यंत 18.5 मि.मी. पाऊस पडला. हा पाऊस यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा ठरला. याआधी दोन-तीन वेळा पडलेल्या पावसाची मिलिमीटरमधील नोंद एक आकडीच होती. शुक्रवारी संध्याकाळी वा-यासह आलेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. सुमारे दोन तास पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते.