आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Again Sushil Kumar Shinde Active For Vishan Sabha Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशीलकुमार शिंदेंना सोबत ‘हवेत’ कोठे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सावध झालेल्या काँग्रेसने आता केंद्र सरकार विरोधात आंदोलन करीत आक्रमकपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी कोठे यांना पुन्हा सक्रिय करून सोबत घेण्याच्या दृष्टीने तसेच येणार्‍या विधानसभा निवडणुकीची बांधणी सुरू केली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे आज अर्धा दिवस सोलापुरात होते. दुपारी ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. त्यावेळी सोबत कोठेंना नेले. तसेच गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील घडामोडींचा अंदाज घेऊन पुढील बांधणी करण्याच्या दृष्टीने आखणी करीत आहेत. दुरावलेले घटक जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पक्षातील पदाधिकारी बदलून काहीसे चैतन्य आणण्याचाही प्रयत्न झाला आहे.

शिंदेंची जुळवाजुळव : महेश कोठे व त्यांच्या सर्मथक नगरसेवकांनी बंडखोरीची भाषा वापरल्यानंतर काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण होते. महापालिकेत सत्तांतर होईल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात महेश कोठे यांनीच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला होता. आज शिंदे यांनी कोठेंना मुंबईला सोबत तर नेलेच पण त्यांची समजूतही काढली. विष्णुपंत कोठे यांना मी विसरलेलो नाही, अन् कधीही विसरणार नाही. त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले. तुम्ही तर घरच्यासारखेच आहात, असे सांगून कोठे यांची समजूत काढल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासोबत नगरसेवक चेतन नरोटेही होते.
दोन दिवस आंदोलने
जात पडताळणीचे दाखले मिळण्यासाठी अडचणी येत आहेत, कार्यालयात पुरेसा कर्मचारी व अधिकारी वर्ग नसल्याने त्यात भर पडली आहे. सध्या शैक्षणिक प्रवेशांचे दिवस आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये रोष आहे. तसेच, केंद्र सरकारने रेल्वे तिकीट दरात वाढ केल्याने नागरिकांमध्येही रोष आहे. तो आणखी गडद करण्यासाठी सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सात रस्ता येथील सामाजिक न्याय भवनासमोर आंदोलन होणार आहे. तर मंगळवारी शहर काँग्रेस कमिटीतर्फे महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम जिल्हा परिषदेसमोर सुरू केली जाणार आहे.
आक्रमकतेचा प्रयत्न
गेल्या 10 वर्षांत राज्यात आणि केंद्रातही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे काँग्रेसला विरोधक म्हणून तेवढय़ा ताकदीने उतरता येणे कठीण दिसत आहे. परवा रेल्वे दरवाढीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्याऐवजी नेहमीच्या सवयीप्रमाणे जय म्हणत त्याची प्रचिती आणून दिली. आता आक्रमकपणे विरोधक म्हणून उतरण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
उत्तरची तेढ राहणारच
शहर मध्य मतदार संघातून प्रणिती शिंदे याच काँग्रेसच्या उमेदवार राहणार, असे पक्षातून सांगितले जात आहे. मात्र शहर उत्तरमध्ये कोण याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. उमेदवारी दिली तरच पक्षात राहू, असे तेथील बहुतेक इच्छुकांनी पवित्रा घेतला आहे. महेश कोठे यांनी तर तसे जाहीरपणे बोलूनही दाखविले होते. तर विश्वनाथ चाकोतेंचा पवित्राही तसाच आहे. कोठे शिवसेनेच्या तर चाकोते मनसेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोठे की चाकोते, हे ठरविणे काँग्रेसला कठीण जाणार असल्याचीही चर्चा आहे.